Minister Gulabrao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करु नका, त्यांच्यावर टीका करण्याची आपली लायकी नाही.  शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याएवढा मी मोठा माणूस नसल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. त्यांच्यावर टीका करण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. माझ्या लेव्हलचा माणूस संजय राऊत असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. 


शरद पवारांवर टीका करू नका ती आपली लायकी नसल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. मी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर कधीच टीका करत नाही. कारण ती माझी लायकी नाही. मी टीका करतो ती संजय राऊत यांच्यावर कारण तो आपल्या लेव्हलचा माणूस असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Gulabrao Patil : ठाकरेंना का सोडलं? गुलाबराव पाटील म्हणाले, मी जाणार नव्हतो शिंदे साहेबांचा फोन आला अन्...