पुणे: भोसरी विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या मशालीला सुटली नाही तर आम्ही तुतारीचा प्रचार करणार नाही. असा एकमुखी ठराव तर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला असल्याची माहिती आहे. यावर आम्ही पदाचे राजीनामे देऊ, असा इशारा ही देण्यात आल्याची माहिती विश्वासू सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात भोसरी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला गेल्यात जमा आहे. याची कुणकुण लागल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक पवित्र्यात आहेत. भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला, तसेच आम्ही राजीनामे ही देऊ. आत्ताच आपण मीडियात याबाबत बोलायला नको पण हा निरोप मातोश्रीवर जायला हवा, अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतल्याचं बोललं जातं आहे.


 पिंपरी आणि भोसरी विधानसभेत शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या तुतारी चिन्हावर किंवा काँग्रेसने उमेदवार दिला, तर त्याचं काम आम्ही करणार नाही. भोसरी आणि पिंपरीत मशाल चिन्हचं हवं असा आग्रह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात भोसरी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला गेल्यात जमा आहे. याची कुणकुण लागल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक पवित्र्यात आहेत. भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला, तसेच आम्ही राजीनामे ही देऊ, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.


पिंपरीत अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा राष्ट्रवादीला विरोध


पिंपरी मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा सांगायला सुरूवात केली आहे तर या ठिकाणी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षाचा आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध दर्शवला आहे. पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना विरोध दर्शवला आहे. लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर लावल्याचं दिसून आलं. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे, अशी माहिती आहे.