धुळे:  लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Election)  बिगूल वाजलं आहे.काँग्रेसकडून देखील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पण उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर  धुळे काँग्रेसमध्ये (Dhule Congress)  नाराजी नाट्य सुरु झालं आहे. धुळ्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असूनही आपल्यावर अन्याय झाला. त्यामुळे राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया श्याम सनेर यांनी व्यक्त केली आहे. या वेळी त्यांचा कंठ देखील दाटून आला.  


गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया श्याम सनेर यांनी व्यक्त केली आहे. पक्षाने बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आपण राजीनामा दिला असून पुढील दोन दिवसात उमेदवार बदलाबाबत कुठलाही निर्णय न झाल्यास आपण कठोर भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रिया शाम सनेर यांनी व्यक्त केली आहे.. दरम्यान शाम सनेर यांच्या राजीनामामुळे काँग्रेस मधील नाराजी समोर आली असून याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 


गरीब असल्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा नेतृत्वाने बळी घेतला : श्याम सनेर


अनेक नेत्यांना काँग्रेस पत्र सोडला पण मी माझा मूळ विचार आणि काँग्रेसच्या विचारसरणीशी कधीही तडजोड करणारा कार्यकर्ता आहे. आजही मी संविधानाचे पुजा करतो. मी आजही लोकशाही तत्त्वे जोपसणारा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्षाकडे मी लोकसभेची उमेदवारी माागितली होती. गेल्या 30 वर्षात मी कधीच एवढा व्यथीत झालो नाही एवढ व्यथीत मला पक्ष श्रेष्ठींनी  लोकसभेच्या उमेदवारीच्या महिनाभराच्या काळात केले आहे.सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही, सक्षम चेहरा नाही, सामान्य आणि गरीब  असल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा नेतृत्वाने बळी घेण्याचा काम केले आहे. बाहेरुन उमेदवार आणून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. 


उमेदवार  बदला, अन्यथा  धडा शिकवण्यास मागे - पुढे बघणार नाही : श्याम सनेर


धुळ्याचा उमेदवार तात्काळ बदला. अन्यथा निश्चिक केलेल्या कार्यकर्त्याला धडा शिकवण्यास मागे - पुढे बघणार नाही. मतदारसंघात असणारा सक्षम उमेदवारच द्या बाहेरून उमेदवार आणू नका, असेही  श्याम सनेर या वेळी म्हणाले.  धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने  गुरुवारी सायंकाळी माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. धुळ्यात आता भाजपचे डॉ. सुभाष भामरे, काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव आणि वंचितच्या अब्दुल रेहमान यांच्यात मुख्य लढत बघायला मिळणार आहे .


हे ही वाचा :


जागावाटपात आमच्या नेत्यांनी कडक भूमिका घेणं गरजेचं होतं, नानांचं नाव न घेता वर्षा गायकवाडांची परखड टीका