Dhananjay Munde: नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर परळीचे राजकारण अधिक तापत असून महायुतीच्या प्रचारसभेत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जोरदार भाषण करत राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Faction) गेलेल्या दीपक देशमुख (Deepak Deshmukh) यांच्यावर जोरदार टीका केली.

Continues below advertisement

धनंजय मुंडे म्हणाले की, “ज्याचा मी जीव वाचवला, ज्याच्यासाठी माझं घर फुटलं, आज तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला. त्याने तर देवाला सोडलं नाही. वैद्यनाथ मंदिरावर हातोडा चालवला. त्याला मतदान देणार का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी दीपक देशमुख यांच्यावर निशाणा साधला.  पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, त्याने माझ्याशी गद्दारी केली. अपघातात हात तुटला तेव्हा 40 लाख रुपये मी दिले, पण तो गद्दार झाला, असं म्हणत त्यांनी दीपक देशमुख यांच्यावर टीका केली. 

Dhananjay Munde: ‘मला नको, उमेदवाराला हार घाला’; प्रचार रॅलीत धनंजय मुंडेंचा संदेश

परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे यांच्या परळीच्या वेगवेगळ्या प्रभागात रॅलीत सहभागी झाले. आज आमदार धनंजय मुंडे यांनी सकाळपासूनच प्रभागांमध्ये रॅलीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून गाठीभेटी घेतल्या. यावेळी ठिकठिकाणी मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. स्वागतादरम्यान नागरिकांकडून धनंजय मुंडे यांना हार घातला जात असताना 'मला नको तर प्रभागातील उमेदवाराला हार घाला', असे मुंडे नागरिकांना म्हणाले. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Continues below advertisement

Rajashree Munde: महायुतीच्या विजयाचा व्यक्त केला विश्वास 

दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या नगर परिषद प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. आज राजश्री धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार फेरी काढली. सावता माळी मंदिरात नारळ फोडत त्यांनी प्रचारफेरीला सुरुवात केली. प्रचारफेरीदरम्यान राजश्री मुंडे यांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. त्यांचे महिलांकडून औक्षण देखील करण्यात आले. महायुती आणि धनंजय मुंडे यांच्या बाजूने वातावरण असून जातीपातीवर नाही तर विकासावर मतदान होणार असून त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण? म्हणाले, 'आज इथे एक माणूस नाहीये'

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde: ...तर धन्याइतका नीच माणूस पृथ्वीतलावर असूच शकत नाही; वाल्मिक कराडची आठवण काढताच धनंजय मुंडेंवर जरांगेंची बोचरी टीका