Eknath Shinde and Uday Samant: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यवतमाळच्या (Yavatmal) पांढरकवडा तालुक्यातील जाहीर सभेत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना थेट फोन करून स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या मागणीवर तात्काळ निर्णय घेतला. पांढरकवड्यात एमआयडीसी उभारण्यासंदर्भातील हा दूरध्वनी संवाद सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Continues below advertisement


सभेदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लोकांच्या रोजगारासंबंधीच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देत मंचावरूनच उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला. शिंदे यांनी सामंतांना विचारले की, “उदय सामंतजी, मी इथे पांढरकवड्यात सभेत आहे. लोकांची मागणी आहे की, रोजगार नाही, एमआयडीसी हवी आहे. जागा देण्यास तयार आहेत. मी त्यांना शब्द देऊ का? असा सवाल त्यांनी उदय सामंत यांना विचारला.  


Eknath Shinde and Uday Samant: उदय सामंतांकडून सकारात्मक प्रतिसाद


यावर उदय सामंत यांनी त्वरित उत्तर दिले. 'द्या नक्की साहेब,' असे म्हणत उदय सामंत यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.  त्यामुळे सभास्थळी उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष केला. त्यानंतर शिंदे यांनी पांढरकवडा येथे एमआयडीसी उभारली जाणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले. 


Eknath Shinde and Uday Samant: स्थानिकांसाठी दिलासा


पांढरकवड्यातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून रोजगार आणि औद्योगिक विकासाची मागणी होत होती. जागा देण्याची तयारीही स्थानिकांनी दर्शवली होती. उपमुख्यमंत्र्यांनी देखील जाहीरपणे ही मागणी मान्य करत तात्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याने पांढरकवड्यातील विकासाला नवी गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


Eknath Shinde: वणी येथील सभेतून प्रदूषण अधिकाऱ्यांना थेट आदेश


दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे वणी येथील सभेत कोळशाच्या प्रदूषणामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांचा मुद्दा उपस्थित केला. सभेतूनच त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन करत कठोर निर्देश दिले. “कोळशाच्या धुरामुळे नागरिक त्रस्त आहेत. 24 तासांच्या आत परिस्थिती सुधारण्यासाठी कारवाई करा, ” असे त्यांनी म्हटले. तर अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ उपाययोजनांचे आश्वासन दिले.


राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानं गोची, कोणत्या जागांवरुन रस्सीखेच?; राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीची Inside Story


Uddhav Thackeray Meets Raj Thackeray: ठाकरे बंधूंमध्ये थेट चर्चा; उद्धव ठाकरे एकटेच राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल, 'शिवतीर्थ'वर काय घडतंय?