Manoj Jarange Patil on Dhananjay Munde: परळीतील प्रचारसभेत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) आठवण काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. "आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही, याची जाणीव होते," असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. आता धनंजय मुंडे यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी जोरदार टीका केली आहे. 

Continues below advertisement

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो. जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचे कधीच समर्थन करायचे नाही. अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजित पवार यांचे डोळे अजूनही उघडले तर बरे होईल. गोरगरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde: फडणवीस, अजित पवारांनी आता डोळे उघडावे

शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत. गुंडगिरी, भ्रष्टाचार करणे, लोकांच्या जमिनी हडपणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळून, ब्लॅकमेल करून आपला संसार मोठा करायचा, असे भयंकर पाप कराड करत होता. धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडले पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत. नाहीतर धनंजय मुंडे यांच्या पापात तुम्ही देखील खाक व्हाल, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, असा गुंड आणि टोळ्या सांभाळणारा माणूस जनतेसाठी घातक आहे. त्याला सरकारने तात्काळ जेरबंद करायला पाहिजे, माझ्या मॅटरमध्ये चल ना नार्को टेस्ट करायला, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना दिले आहे.

Continues below advertisement

Dhananjay Munde on Walmik Karad: काय म्हणाले होते धनंजय मुंडे? 

धनंजय मुंडे म्हणाले होते की, "जगमित्र कार्यालयातून गोरगरिबांची सेवा करत आलो, गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून हे कार्यालय सुरू आहे, काम सुरू आहे. पण आज एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, याची जाणीवही होते. काय चुकले, काय नाही, ते न्यायालय बघेल, पण ती जाणीव नक्कीच आहे, असे त्यांनी म्हटले होते. 

आणखी वाचा 

Dhananjay Deshmukh : निवडणुकीच्या काळात मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण, धनंजय देशमुखांचा हल्लाबोल, चुकीची कामं बंद झाल्यामुळे....