Beed: आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत. तीन वर्षांनी त्यांना निवडणूकीमुळे शेतकऱ्यांची आठवण झाली आहे. असं म्हणत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी एकदा तिफणीवर बसावं मग बघू कोण जास्त ओढतं पाहू असं आव्हान त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलंय. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते आज मराठवाड्यात नुकसानपाहणीसाठी दाखल झाले आहेत. राज्यात सध्या बांधावरचं राजकारण सुरु असून
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी जालन्यातील अंबडगाव येथे अतिवृष्टी ने झालेल्या नुकसानीची पाहणी केली, यावेळी त्यांनी कापूस आणि मोसंबी उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद करत नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी मोसंबी उत्पदक शेतकऱ्यांच्या मोसंब्या नासल्यानं शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. "आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला जाग आली आहे. आमच्या सरकारनं ,उद्धवसाहेबांनीच शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला. सगळीच मदत काही अपेक्षित नसते, काळजीपूर्वक कोणी येऊन धीर द्यावा हे अपेक्षित आहे." असे आदित्य ठाकरे म्हणाले.
एकदा तिफणीवर बसून दाखवा..
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आज परभणीतील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करताहेत त्यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर धनंजय मुंडेंनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.आदित्य ठाकरे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले तीन वर्षानंतर तेही निवडणूक असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली आहे माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी माझ्यासोबत एकदा टिफणीवर यावं कोण जास्त मारते हे बघू असा आव्हान धनंजय मुंडे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
आदित्य ठाकरेंच्या नुकसान भरपाईचा दौरा
मराठवाड्यात झालेल्या तुफान पावसानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह खासदार संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे या ठाकरे गटाच्या नेत्यांनी मराठवाड्यात शेताच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी केली. यावेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत असा दिलासा दिला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका कर आम्ही राजकीय मंडळी आणि सत्तेतील राजवटीने जमिनीवर उतरून शेतकऱ्यांना मदत करावी अस आवाहन केलं, दरम्यान यावेळी त्यांनी ई पीक पाहणी वरती टीका करत शेतकऱ्यांना भरावा लागत असलेला फॉर्म स्पर्धा परीक्षेत सारखा असल्याचंदेखील त्यांनी म्हटलय..
शरद पवारांच्या पवारांच्या वक्तव्याचा धनंजय मुंडेंनी घेतला समाचार
काल कोल्हापूर येथे शरद पवार यांनी जाहीर सभेत सांगितले की हे महायुतीचे सरकार आपल्याला राज्यातून घालवायचे आहे याविषयी धनंजय मुंडे यांना विचारले असता त्यांनी हे माहितीचे सरकार राज्यातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देत आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांचा पिक विमा असेल शेतकऱ्यांना दरमहा नमो शेतकरी योजना असेल तसेच वेगवेगळ्या घटकांसाठी राज्य सरकार प्रत्यक्ष लाभाच्या योजना राबवत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहे अशा चांगल्या योजना राबवणाऱ्या सरकारला का घालवायचे आहे असा सवालच धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.