लातूर : विरोधकांनी कधीही भरपाई दिली नाही, हे पहिले सरकार आहे ज्यांनी पाहणीपूर्वीच 2200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रिलीज केले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच, विरोधकांकडून होत असलेल्या मागणीवरुन आणि टिकेवरुन पलटवारही केला. “शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल ते आम्ही करत आहोत आणि पुढेही करू,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील पूरग्रस्त (Flood) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लातूर (Latur) जिल्हा दौऱ्यावर असून येथील निलंग्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला. 

Continues below advertisement

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. “घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “विरोधकांनी कधीही भरपाई दिली नाही. हे पहिले सरकार आहे, ज्यांनी पाहणीपूर्वीच 2200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रिलीज केले आहेत. शेतकऱ्यांच्या दु:खात राजकारण करणे योग्य नाही. कधीतरी विरोधकांनी आरशात पाहावे, त्यांच्या काळात आपत्ती आली तेव्हा त्यांनी काय केले होते?” असा टोलाही फडणवीसांनी लगावला. तर, शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल ते आम्ही करत आहोत आणि पुढेही करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात मोठं नुकासान झालं आहे. मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे, सोबतच जीवितहानीही झाली आहे. 

मराठवाड्यात 23 लाख 414  हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान ( Marathwada flood)

गेल्या दोन दिवसातील पावसानंतर हा आकडा 25 लाख हेक्टर पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 1239 गाव बाधित झाली आहेत. 2 लाख 61 हजार 709 शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. 22 लाख 9 हजार 4 हेक्टर जिरायत पिकांचे नुकसान झालंय. 1023 हेक्टर वरील बागायत तर 387 हेक्टर वरील फळपीक वाया गेले आहे. विभागीयुक्त कार्यालयांना तसा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. सर्वाधिक नुकसान धाराशिव जिल्ह्यात झाले असून 6 लाख 29 हजार 890 हेक्टर पिकांचे नुकसान झाले.

Continues below advertisement

जीवितहानी आणि वित्तहानी ( 10 death in marathwada rain)

मराठवाड्यात एकूण 10 जणांचा मृत्यू झाला.त्यातील 4 जणांचा शोध सुरू आहे. त्यात जिल्ह्यातील लातूर 2, धाराशिव 3, बीडमधील 3 तर नांदेडमध्ये 1 जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात एकूण लहान-मोठी 337 जनावरे दगावली. त्यात संभाजीनगर जिल्ह्यात 5, जालना 23, परभणी जिल्हात 24, हिंगोलीमध्ये 6, नांदेड जिल्ह्यात 9, बीड जिल्ह्यात 63, लातूर जिल्ह्यामध्ये 7, धाराशिव जिल्ह्यातील 200 जनावरांचा समावेश आहे.

मराठवाड्यात 1393 ठिकाणी नुकसान (Marathwada flood)

13 ठिकाणी रस्ते वाहून गेले.6 ठिकाणी फुल वाहून गेले.फुटलेल्या तलावांची संख्या २० आहे.1393 पक्की घरे पडली झालीदोन शाळाची पडझड झाली.

हेही वाचा

राष्ट्रवादीचे आमदार-खासदार 1 महिन्याचा पगार देणार; भुजबळ म्हणाले, गहू-तांदूळही वाटप करणार