Devendra Fadnavis on Santosh Bangar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान सुरु आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) एका वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांच्यावर केला जात आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संतोष बांगर यांना चांगलेच फटकारले आहे. 

Continues below advertisement

हिंगोलीतील कळमनुरी येथे मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. मात्र मतदान केंद्रात त्यांच्या वागणुकीने मोठा वाद उभा राहिला. त्यांनी महिला मतदाराला प्रत्यक्ष ईव्हीएम बटन दाबताना मार्गदर्शन केले, तसेच “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं”, अशी घोषणाबाजी मतदान केंद्रातच केली. याचदरम्यान मोबाइल फोनचा वापरही त्यांनी केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.  मतदान केंद्रात घोषणाबाजी, मोबाईल वापरणे किंवा मतदाराला कोणताही निर्देश देणे हे निवडणूक गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे या प्रकरणावर संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Devedra Fadnavis on Santosh Bangar: फडणवीसांनी संतोष बांगरांना सुनावले 

या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संतोष बांगर यांना खडेबोल सुनावले आहेत. “किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

Santosh Bangar: निवडणूक अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल 

दरम्यान, संतोष बांगर यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोपनीयतेचा भंग झाला असल्याचे आढळल्यास संतोष बांगर यांच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. या संदर्भात तातडीने अहवाल मागवण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हे पहिल्यांदा होतंय...'

Sanjay Raut on Eknath Shinde: 'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले