Devendra Fadnavis on Ajit Pawar Eknath Shinde and Sharad Pawar : राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील जनतेला 2019 पासून सातत्याने येत आहे. कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येत युती आणि आघाड्या केल्यामुळे राजकारणात काहीही शक्य आहे, असे बोलले जाते. सध्याच्या राज्याच्या राजकारणातही असाच काहीसा प्रवाह पाहायला मिळत आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या राजकीय विरोधकांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे तोंडभरून कौतुक केले. शरद पवार यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला आवडतात, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, जय-पराजयाची तमा न बाळगता पवार सातत्याने काम करत राहतात, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आहे, असेही त्यांनी नमूद केले. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील संवाद तितका प्रभावी नसल्याचेही स्पष्टपणे सांगितले, त्यामुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.


फडणवीसांकडून शरद पवारांचं कौतुक


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इंडियन एक्सप्रेस ग्रुप'च्या 'एक्सप्रेस अड्डा' या कार्यक्रमात म्हटले आहे की, "शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण काही गोष्टी अशाही आहेत, ज्या मी स्वीकारत नाही. पण मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात, असे वक्त्यव्य त्यांनी केले आहे. 


अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत


तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगलं आहे? याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे म्हणत त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्रुटी दाखवली आहे. अर्थात हे दोघे या मताबाबत आपल्याला माफ करतील, असे देखील वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 



इतर महत्त्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहणन करणाऱ्या वकिलाचे जुने प्रकरण समोर, मारहाणी प्रकरणी 3 वर्षापूर्वीच गुन्हा


दादाच पॉवरफुल! 132 आमदारांच्या भाजपलाही अजितदादा भारी, गाऱ्हाने थेट अमित शांहाच्या दरबारी