Mahayuti Seat Sharing : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीवारी करुन मुंबईत परतल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले होते, त्यानंतर आज देंवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यासाठी रवान झाल्यास भाजप-मनसे युतीवर लवकर शिक्कामोर्तब होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप-मनसे युतीच्या हालचालींना वेग आला आहे.


राज ठाकरेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी


महायुतीमध्ये सध्या जागावाटपासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे.  दिल्लीत सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर मंगळवारी सकाळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अमित शाहांची भेट घेतली. आता फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लासाठी रवाना


आज राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट झाल्यानंतर आता फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाल्याने ही भेट महत्वाची मानली जात आहे. याआधी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातही अनेक गुप्त बैठका झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मनसे आता महायुतीत सामील होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


मनसे महायुतीत सामील होणार?


उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज सकाळपासूनच बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतरही जागावाटपाचा तिढा कायम आहे. याबाबत चर्चा आणि बैठका सुरुच आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली. त्याआधी मुंबईत तीन वेळा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका झाल्या होत्या. मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहेत. अशात या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत आहे. 


राज ठाकरे काय निर्णय घेणार?


राज ठाकरे यांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील एक-दोन दिवसात महायुतीतील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फडणवीसांच्या दिल्लीवारीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यातच अमित शाहांची भेट घेऊ मुंबईत परतलेले राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे.






राज ठाकरे यांनी घेतली अमित शाहांची भेट


मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे सोमवारी रात्री उशिरा दिल्लीसाठी रवाना झाले होते.  त्यानंतर मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांनी अमित शाहांची भेट घेतली. अमित शाहांच्या भेटीनंतर राज ठाकरे मुंबईत परतले आहेत. मात्र, भाजप-मनसे युतीबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.