Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल माझी मिमिक्री केली. माझी मिमिक्री केलेलं मला आवडतं. पण, तुमच्या काकांना मिमिक्री तरी करता येते, चांगलं भाषण करता येतं. तुम्हाला तर तेवढं पण करता येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल शिवतीर्थावर महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीवर प्रतिक्रिया दिली. (Aditya Thackeray Mimicry)

Continues below advertisement

गेल्या दोन-तीन सभेतून आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis On Aditya Thackeray) मिमिक्री केली होती. आदित्य ठाकरेंनी केलेल्या या मिमिक्रीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. आता आदित्य ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. नक्कल करता करता काकांच्या पक्षाची अवस्था काय झाली. काकांना नक्कल तरी करता येते. भाषण करता येतं. तुमची अवस्था काय झाली?, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केली. (Devendra Fadnavis On Aditya Thackeray)

गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीवरुन केलेल्या टीकेलाही प्रत्त्युत्तर- (Devendra Fadnavis On Gautam Adani)

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात उद्योगपती गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीवरुन केलेल्या टीकेलाही प्रत्त्युत्तर दिलं. भारताची अर्थव्यवस्था 2014 मध्ये जगात 11 वी होती, आता 5 वी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे, गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणात उद्योजक भारतात वाढले आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी देशातील मोठमोठ्या उद्योगपतींची संपत्ती आणि कमाईचे आकडेच वाचून दाखवले. तसेच, गौतम अदानींनी केवळ महाराष्ट्रातच नाही, तर काँग्रेस सरकार असलेल्या राज्यात, महाविकास आघाडीतील पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसोबतही अनेक करार करुन उद्योग प्रस्थापित केल्याचे फोटो जाहीर सभेत दाखवले. 

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषण, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray On Gautam Adani: अदानींवर टीका करताच भाजपने फोटो काढला; आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझ्या घरी...

Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...