Ajit Pawar Irrigation Scam: अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी पाठिंबा दिला, असे वक्तव्य विजय पांढरे (Vijay Pandhare) यांनी केले. विजय पांढरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता होते. विजय पांढरे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार (Ajit Pawar)यांच्याविरोधातील जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला.

Continues below advertisement


अजित पवार हे सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार होते. त्याप्रकरणी अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसने अजित पवार यांची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला तर सरकार पाडण्यात आले. जलसिंचन खात्यातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली होती. पण त्यावेळी चितळेंनी पळपुटेपणा केला. त्यांनी अहवालात गोष्टी होत्या तशा नीटपणे मांडल्या नाहीत. त्यामुळे सरकारला याप्रकरणात संधी मिळाली, असे विजय पांढरे यांनी म्हटले.


देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीनचिट देण्याचे काम केले. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पाठीशी घालणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीनचिट दिल्याची लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली. मात्र, अद्याप नागपूर खंडपीठाने ती क्लीनचिट मान्य केलेली नाही. सध्या या प्रकरणाची सुनावण होत नाही, ही खरी अडचण आहे, असेही विजय पांढरे यांनी सांगितले.


Vijay Pandhare & Ajit Pawar: जलसिंचन घोटाळाप्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाई केली तर अजित पवार दोन दिवसांत जेलमध्ये जातील: विजय पांढरे


माधवराव चितळे समितीने जलसिंचन घोटाळ्याच्या अहवालात भ्रष्टाचाराबाबत पुरेशा गोष्टी नमदू केल्या होत्या. माधवराव चितळे यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, याप्रकरणात चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे. मात्र, सरकारने चितळे समितीचा अहवालही लपवून ठेवला. चितळे यांनी म्हटले होते की, मी दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली तर अजित पवार जेलमध्ये जातील. मात्र, अजित पवारांचे जलसिंचन घोटाळ्याचे काम लपवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, यामध्ये शंका नाही, असेही विजय पांढरे यांनी म्हटले.



आणखी वाचा


'तुम पे ॲक्शन लुंगा, इतनी डेरिंग तुम्हारी...', तो 'व्हिडीओ' जाणिवपूर्वक व्हायरल, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दादांची पाठराखण करत महिला अधिकाऱ्यांची दाखवली चूक