Nanded North Vidhansabha Election : पुढच्या काही दिवसातच राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhasabha Election) आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, दौरे, संवाद सुरु केलाय. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापैकी आज आपण नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ (Nanded North Assembly constituency) मतदासंघाची माहिती पाहणार आहोत. सध्या या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) हे आमदार आहेत. 


2019 च्या निवडणुकीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?


नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे बालाजी देविदासराव कल्याणकर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. बालाजी कल्याणकतर यांनी काँग्रेस पक्षाचे डी.पी. सावंत यांचा पराभव केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे डी.पी.सावंत 40,356 मते मिळवून विजयी झाले होते. यावेळी त्यांनी भाजपा पक्षाचे सुधाकर रामराव पांढरे  यांचा पराभव केला होता. 


यावेळी नेमकं काय होणार? 


नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा ऐकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2009 साली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मर्जीतले डी पी सावंत हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. ते पहिल्यांदाचं आमदार झाले होते. त्यानंतर ते राज्यमंत्री देखील झाले. पुढे ते नांदेडचे पालकमंत्री झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत देखील डी पी सावंत निवडून आले. मात्र, 2019 साली काँग्रेसचा हा बालेकिल्ला ढासळला. या मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर निवडून आले. या मतदारसंघात  हिंदू आणि मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे. दरम्यान, यावेळी नेमकं काय होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांना भाजपचा वाढता विरोध आहे. महायुतीत ही जागा भाजपला सुटावी अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपमधून मिलिंद देशमुख हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून अद्याप कोणाचेही नाव समोर आले नाही. कारण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डी पी सावंत काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले. दरम्यान, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळते की शिवसेना ठाकरे गटाला मिळते हे पाहणं गरजेचं आहे. माधव पावडे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. अद्याप महाविकास आघाडी किंवा महायुतीचे जागावाटप झाले नाही. 


महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसला की ठाकरे गटाला सुटणार?


राज्यात दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होण्याची  शक्यता आहे. पुढच्या काही दिवसातच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्वच मतदारसंघात हालचालींना वेग आला आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. जागावाटपात ही जागा कोणाला जाईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहेत. महाविकास आघाडूकडून ही ठाकरे गटाला सुटणार की काँग्रेसला जाणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर ममहायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार की भाजपला जामार याकडं देखील सर्वाचं लक्ष लागलं आहे. 
 


महत्वाच्या बातम्या:


विधानसभेची खडाजंगी: नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काय? कोणत्या पक्षाचे किती आमदार? सविस्तर माहिती एका क्लिकवर