Devendra Fadnavis and Ajit Pawar arrived in Delhi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दोन्ही नेते दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. आज रात्री महायुतीच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्यानंतर बैठक होणार आहे. मुख्यमंत्री थोड्याच वेळात दिल्लीत पोहोचणार आहेत. दरम्यान, आज जागावाटपाबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
महायुतीच्या जागावाटपावर अद्याप कोणताही निर्णय झालेला
महायुतीच्या जागावाटपावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. कोणत्या पक्षानं किती जागा लढाव्या यावर अंतिम निर्णय कधी येणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दिल्लीत दाखल होतील. त्यानंतर सर्वांची दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
येत्या 20 नोव्हेंबरला मतादन प्रक्रिया पार पडणार
दरम्यान, राज्यात सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढवल्या आहेत. इच्छुकांनी गठी भेटी सुरु केल्या आहेत. तिकीट मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु होताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध सत्ताधाऱ्यांची महायुती यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. ही निवडणूक अनेक मुद्यांनी गाजणार आहे. अनेक ठिकाणी तुल्यबळ लढती होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला मतादन प्रक्रिया पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेच 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यानंतर राज्याचे नवे कारभारी कोण हे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: