Walwa Vidhansabha News : आचारसंहिता लागू झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गाठीभेटी, दौरे सुरु केले आहेत. महाविकास आघाडीसह महायुतीत जागावाटपासंदर्भातील चर्चा सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना वाळवा मतदारसंघात (Walwa Vidhansabha) घेरण्यासाठी महायुतीनं प्लॅनिंग सुरु केली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना वाळवा मतदारसंघात अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर उभे करण्याचा महायुतीचा प्लॅन असल्याची चर्चा सुरु आहे. 




मुंबईत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची  निशिकांत पाटील भेट घेणार


भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील वाळवा मतदारसंघात अजित पवार यांच्या घड्याळाच्या चिन्हावर जयंत पाटील यांच्या विरोधात राहणार उभे राहण्याची शक्यता वर्तवली जातेय. उद्या मुंबईत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची  निशिकांत पाटील भेट घेणार आहेत. भेटीनंतर वाळवा मतदारसंघात अजित पवार गटांकडून निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 


 इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला


इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2008 मध्ये विधानसभा मतदारसंघांची फेरमांडणी झाल्यानंतर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्याआधी हा मतदारसंघ वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत राजाराम पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आधी वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मागील तीन दशकांपासून जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. 2009 , 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने जयंत पाटील विधानसभेवर निवडून गेले आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.


महत्वाच्या बातम्या:


NCP : जयंत पाटील, रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार, महायुतीत जागा अजित पवारांकडे जाणार