Delhi Rain : दिल्लीमध्ये बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे दिल्लीतील जनजीवन अक्षरश: विस्कळीत झालंय.  मुसळधार पावसामुळे नवीन बांधण्यात आलेल्या संसदेत पाणी साचलं आहे. दरम्यान, नवीन संसद बांधताना याबाबतची काळजी घेण्यात आली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. 






दिल्लीतील पावसाचा फटका नव्या संसदेलाही बसलाय, नव्या संसदेत पाणी साचले आहे. दिल्लीत आज सांडगतकाळू झालेल्या मुसळधार पावसाळामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. संसदेच्या मकरद्वारजवळही पाणी साचलय.  परंतु संसदेच्या अधिवेशनावर त्याच परिणाम होईल अस अद्याप तरी दिसत नाहीये. 


दिल्लीत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे


 रस्त्यांवर आणि अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोक अडकले आहेत. अनेक ठिकाणची परिस्थिती अशी आहे की, गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्याचवेळी, पावसामुळे दिल्लीच्या AQI मध्ये मोठी सुधारणा दिसून आली आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक लोक अडचणीत आले असून, सखल भागात असलेल्या वस्त्या आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे.






तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता


राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत संततधार पावसामुळे ओल्ड राजिंदर नगरमध्ये पाणी साचले होते. 27 जुलै रोजी येथील आयएएस कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. राष्ट्रीय राजधानीतील मानसिंग रोड, एम्स, नोएडाच्या सेक्टर 59, सेक्टर-62, ममुरा, गिझोर आदींव्यतिरिक्त अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने आयटीओजवळ वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांचा वेगही मंदावल्याने दृश्यमानता कमी झाली. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Kangana Ranaut : कट्टर मोदीभक्त कंगना रणौतचा राहुल गांधींवर पहिला हल्ला, म्हणाली, 'त्यांची ड्रग्ज टेस्ट...'