Deepak Kesarkar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपावर सडकून टीका केली. भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यावर मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. 


दीपक केसरकर म्हणाले की, ज्यावेळी काँग्रेसचे (Congress) सरकार होते तेव्हा सीबीआयला पोपट बोलायचे आणि आता तेच शरद पवार इडीवरून (ED) टीका करत आहेत. त्यांनी आधी उमेदवारी जाहीर करावी. मग आम्ही बघू काय करायचे, असे ते म्हणाले. 


मुख्यमंत्री अनेक जणांना भेटतात


राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबत संबंध असल्याचे फोटोज व्हायरल करत आहेत. यावरून दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक जण भेटतात. त्यांच्यासोबत फोटो काढतात. अनेक जण कोण आहेत हे माहीत नसतं. प्रमुख म्हणून मुख्यमंत्री भेटतात. पण, त्याचा अर्थ वेगळा काढणे योग्य नाही. 


संजय राऊत हे अ‍ॅसिडीटी झाल्यासारखे बोलतायेत


संजय राऊत (Sanjay Raut) हे अ‍ॅसिडीटी झाल्यासारखे बोलतायेत. दिल्लीवरून आल्यावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) मोदींना भेटणार होते आणि भाजपसोबत जाणार होते. मात्र, संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि वाट लागली. याला जबाबदार संजय राऊतच आहेत, असे टोला त्यांनी लगावला आहे. 


बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा ही आमचीही मागणी


बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) भारतरत्न मिळायला हवा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले. त्यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे सरकारकडे ही मागणी केली आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील बाळासाहेबांना भारतरत्न देण्यासंदर्भात ट्वीट केले आहे. यावर दीपक केसरकर म्हणाले की, ज्यांना भारतरत्न दिले आहे ते राजकीय म्हणून नाही, त्यांचे योगदान म्हणून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा ही आमचीही मागणी आहे.


राज्य सरकारचे शिष्टमंडळ लवकरच जरांगे पाटलांची भेट घेणार


मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) आमरण उपोषणाला बसले आहेत. यावर दीपक केसरकरांना विचारणा केली असता राज्य सरकारचे शिष्टमंडळ लवकरच जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  


आणखी वाचा 


Sharad Pawar: राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नाही; शरद पवारांचा अजितदादांना टोला