सिंधुदुर्ग : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा कोसळल्यानंतर वाईटातून चांगले घडते, असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. आता दीपक केसरकर यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे त्यांनी म्हटले आहे. 


दीपक केसरकर म्हणाले मी बोललो होतो की, आम्हाला अतिशय दुःख आहे. झालेल्या प्रसंगा अतिशय दुर्दैवी आहे. परंतु हे वाईट घडून गेले आहे. या वाईटामधून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं, एवढीच आम्ही प्रार्थना करतो. हे करत असताना जयंत पाटील आले आणि माझ्यावर टीका करून गेले. त्यांनी काही केलं का? आम्ही 9 एकर जमीन शोधून काढली. त्याच्यावर आरक्षण आहे. त्या नऊ एकर जमिनीवर शिवसृष्टीची उभारणी होऊ शकते. 12 मीटरचे रस्ते कुठून कुठे जातात हे शोधून काढले. हा प्रस्ताव येथे दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 


मी काय चुकीचं बोललो हे सांगा


ते पुढे म्हणाले की, तिथे अतिशय भव्य पुतळा उभारण्यासंदर्भात भारतातील ज्येष्ठ मर्तिकारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. हे जे घडलंय ते 100% वाईट घडले आहे. यात मी काय चुकीचं बोललो हे सांगा. याचा चुकीचा अर्थ काढण्याचं कारण काय? पुतळा पडला हे चांगलं असं मी कधी म्हटलं का? पुतळ्या पडणं अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामधील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. आज सुद्धा नेव्हीची टीम पुतळा कशामुळे पडला? हे शोधून काढत आहे. दोषींना शिक्षा होईल. मी काय त्यांचे समर्थन केलेले आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक राजकोट येथे होईल


आजही मी ठामपणे सांगतो महाराष्ट्र सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभा करण्यात येणार आहे. सगळ्यात मोठे चित्रकार यांच्याशी आमचे बोलणे झाले असून ते या पुतळ्याचे डिझाईन करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत भव्य दिव्य स्मारक राजकोट येथे होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले आरभारी राजा होते. या गोष्टीमुळे या ठिकाणी शिवाजी महाराजांची स्मृती आणि इतिहास टिकून राहण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


आणखी वाचा


Jaydeep Apte: जयदीप आपटे दोन दिवसांत सरेंडर होईल, ताबडतोब त्याच्या जामिनाची व्यवस्था करा, ठाण्यातून आदेश गेल्याचा संजय राऊताचा दावा