Deepak Kesarkar on Maharashtra Cabinet Expansion मुंबई: मंत्रिपदं न मिळाल्याने नाराज होऊन पक्षाच्या कार्यपध्दतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. काही नाराज आमदारांनी पक्षावर टीका केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रध्दा आणि सबुरी ठेवा कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल . योग्यवेळी त्यांना न्याय दिला जाईल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
अडीच वर्ष मला मंत्रिपद मिळालं, मी त्यात खुश- दीपक केसरकर
तर दुसरीकडे मंत्रिमंडळातून दीपक केसरकर यांना देखील वगळण्यात आले आहे. मात्र दीपक केसरकरांनी संयमी भूमिका घेतली. त्यामुळे दीपक केसरकर यांनी ज्या प्रकारे संयमी भूमिका घेतली आहे, त्याचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक देखील केलं आहे. तर , नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटोतून सुरू असून मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मात्र शिंदे नाराज झाल्याचं कळतंय. अशातच माजी मंत्री दीपक केसरकर यांनी या विषयावर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी नाराज नाही. अडीच वर्ष मला मंत्रिपद मिळालं, मी त्यात खुश आहे. आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी आहे. शेवटी इतराणासुद्धा संधी मिळायला हवी. वय वाढत असतं. आगामी काळात कुणीतरी बाजूला व्हा म्हण्यापेक्षा आपण आधीच बाजूला झालेल चांगल असतं, अशी बोलकी प्रतिक्रिया ही त्यांनी यावेळी दिली आहे.
माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठे नाराजी दिसत आहे का? नव्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघा. पहिल्या शुभेच्छा नितेश राणेंना दिल्या. ते तरुण आहेत, ते चांगलं काम करतील, माझं मार्गदर्शन त्यांना राहिलच. नाराजी असलेल्यांनी संयम ठेवला पाहिजे. गोगावले यांच्याकडे बघा, अडीच वर्ष त्यांनी वाट पाहिली. भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष होते, ते बाहेर आहेत तर कोणीही बाहेर राहू शकतं. भुजबळ यांनी नाराजी दाखवली का? मुनगंटीवार यांनी नाराजी दाखवली आहे का? आम्ही उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. आपण आनंदी राहिले पाहिजे त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. असेही दीपक केसरकर म्हणाले.
शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदासाठी संधी- (Shivsena Cabinet Minister List)
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांना राज्यमंत्री पद-
1. उदय सांमत- कॅबिनेट मंत्री
2. प्रताप सरनाईक- कॅबिनेट मंत्री
3. शंभूराज देसाई- कॅबिनेट मंत्री
4. भरत गोगावले- कॅबिनेट मंत्री
5. दादा भूसे- कॅबिनेट मंत्री
6. प्रकाश आबिटकर- कॅबिनेट मंत्री
7. गुलाबराव पाटील- कॅबिनेट मंत्री
8. संजय राठोड- कॅबिनेट मंत्री
9. संजय शिरसाट - कॅबिनेट मंत्री
10. योगश कदम- राज्यमंत्री
11. आशिष जयस्वाल- राज्यमंत्री
हेही वाचा: