Ramraje Nimbalkar and Deepak Chavan, सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा होती. दरम्यान रामराजेंसोबत काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी फलटणमधून उमेदवारी जाहीर केलेले दीपक चव्हाण देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केली होती


काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांना फोनवरुन  उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, तेच दीपक चव्हाण अजित पवारांची साथ सोडणार आहेत. मात्र, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओघाने आपली उमेदवारी जाहीर केली होती. अजून जागावाटप झाली नसल्याने उमेदवारीचं काही ठरलं नाही, असं दीपक चव्हाण यांनी सांगितलं आहे. 


रामराजे निंबाळकरांसोबत दीपक चव्हाणही तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा 


अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते रामराजे निंबाळकर यांनी साताऱ्यात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राजराजे निंबाळकर यांच्याशी जवळीक असलेले फलटणचे दीपक चव्हाण देखील याच मेळाव्यातून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यात चांगले वातावरण आहे, त्यामुळे अनेक तुतारीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. 


कागल , इंदापूर ते फलटण शरद पवारांचे महायुतीला धक्के


लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांच्या रांगा लागल्यात. कागलमधून हसन मुश्रीफ यांचे विरोधक असलेल्या भाजपच्या समरजीत घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर इंदापूरमध्ये माजी मंत्री आणि भाजप नेते शरद पवारांच्या गळाला लागले. इतकेच नाही तर सोलापुरातील माढ्याचे विद्यमान आमदार असलेल्या बबन शिंदेंनी देखील अजित पवारांची साथ सोडली आहे. आता आज साताऱ्यातील दिग्गज नेते रामराजे निंबाळकर देखील तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या पक्षाला मोठे धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Junnar Assembly constituency : इंदापूरनंतर जुन्नरमध्येही शरद पवारांचे धक्कातंत्र? अतुल बेनकेंना घेरण्यासाठी निष्ठावंत शिलेदाराला मैदानात उतरवणार?


Bhalchandra Nemade : मराठी भाषेला अभिजात दर्जा वगैरे राजकीय गोष्टी, या सगळ्याला फार महत्त्व देऊ नये; ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडेंचं रोखठोक मत