Nagpur News नागपूरनागपूर शहराच्या सहाही विधासभा मतदारसंघासाठी (Maharashtra Vidhansabha Election 2024) काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस  शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी एकही जागा सोडणार नसल्याचे चित्र दिसत आहे. नागपूरच्या सहाही जागा काँग्रेस (Congress) लढणार असल्याचा दावा काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी केला आहे.


नागपूरच्या रविभवन येथे विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहे. मात्र असे असताना दुसरीकडे प्रस्थापितांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी दंड थोपटले असून जे मुलाखतीला आलेच नाही, त्यांना पक्ष तिकीट देणार असेल तर मग हा मुलाखतीचा फास आहे. असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. तर काही उमेदवार मुलाखतीसाठी जोरदार तयारी करून आले आहे. दरम्यान, निरीक्षक म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे. तर नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत 60 इच्छूक उमेदवार मुलाखतीसाठी आले आहेत.


काँग्रेसचे शहर अध्यक्षाचा सर्वच्या सर्व जागांवर दावा 


महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी संपली असून आता  विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच संपूर्ण राज्याला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल आज वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोज आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित करणार आहे.


या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार असल्याची शक्यता आहे. अशातच नागपूर (Nagpur News) शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघावर काही दिवसांपूर्वी काँग्रेसने (Congress) दावा केला होता. त्यानंतर आज परत एकदा काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी नागपूरच्या सर्वच्या सर्व जागांवर आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे मविआत नागपूरच्या जागेवरून खडाजंगी रंगण्याची शक्यता आहे. 


देवेंद्र फडणवीसांविरोधात लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची चढाओढ


नागपूर शहरातील सहा ही विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत 71 इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसकडे उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज केले आहे. यात सर्वाधिक अर्ज हे मध्य नागपूर विधानसभेसाठी 30 अर्ज आले असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठी देखील काँग्रेस मध्ये इच्छुकांची मोठी यादी असल्याचे ही  विकास ठाकरे म्हणाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपक्षाने उसंत घेत घवघवीत यश मिळवले होते. तर राज्यासह विदर्भात  काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वासही आमदार विकास ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केलाय. 


हे ही वाचा