Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रे'च्या  (Congress Bharat Jodo Yatra) तयारीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने AICC महासचिव, पीसीसी अध्यक्ष ( PCC presidents)  आणि भारत जोडी यात्रेच्या राज्य समन्वयकांची (State Coordinators) 29 ऑगस्ट रोजी आयसीसी (AICC) मुख्यालयात बैठक बोलावली आहे. काँग्रेसची ही ऐतिहासिक पदयात्रा असेल, जी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू होईल आणि जम्मू-काश्मीरमध्ये संपेल. तामिळनाडूतील ही यात्रा 7 ते 10 सप्टेंबर असे चार दिवस चालणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पदयात्रा केरळमधून निघेल.


काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले की, ज्या राज्यांमधून ही ऐतिहासिक यात्रा निघेल, त्या राज्यांमधील भारत जोडो यात्रेच्या माध्यम समन्वय साधणाऱ्यांच्या नावांना पक्षाने मान्यता दिली आहे. पवन खेरा यांनी शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाच्या संदर्भात ट्वीट केले होते, ज्यात त्यांनी लिहिले होते की, "आझाद किंवा आझाद यांच्याशिवाय, काँग्रेसची संघटनात्मक व्यवस्था दृढनिश्चयाने पुढे जात राहणार. भारत जोडो यात्रेसाठी राज्यनिहाय माध्यम, प्रसिद्धी प्रभारी आणि समन्वयकांची पहिली यादी जारी करण्यात आली आहे.''


माध्यमे आणि प्रसिद्धी प्रभारींची राज्यनिहाय यादी


यादीनुसार महाराष्ट्रासाठी (Maharashtra) शोभा ओझा, तामिळनाडूसाठी (Tamil Nadu ) शमा मोहम्मद आणि डॉली शर्मा यांना आंध्र प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. दुसरीकडे तेलंगणासाठी एसव्ही रमाणी, जम्मू-काश्मीरसाठी (Jammu Kashmir) अलका लांबा, राजस्थानसाठी विभाकर शास्त्री, पंजाबसाठी अंशुल अभिजित आणि मध्य प्रदेशसाठी (Madhya Pradesh) रागिणी नायक यांना प्रभारी बनवण्यात आले आहे.


राहुल गांधींची भारत जोडो यात्रेची तयारी सुरू 


काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेला सुरुवात करणार आहेत. राहुल यांची ही यात्रा पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणाऱ्या राजस्थानमधूनही निघणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या यात्रेत राज्यातील ग्राउंड रिअॅलिटी पाहण्याची संधी राहुल यांना मिळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही यात्रा राजस्थानला पोहोचेल.


इतर महत्वाच्या बातम्या: 


PM Modi inaugurates Atal Bridge: इतिहास घडवण्यासाठी 'हे' लक्षात ठेवणे आवश्यक, मोदींनी केले 'अटल ब्रिज'चे उद्घाटन
Jammu Kashmir :  गुलाम नबी आझाद 14 दिवसांत नवा पक्ष स्थापण करणार, काश्मीर युनिटपासून होणार सुरुवात