C-Voter Survey On Modi Vs Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र (Narendra Modi) मोदींना टक्कर देऊ शकतील का? हा प्रश्न अनेकांना पडला असेलच. मात्र हा प्रश्न निर्माण झाला कुठून, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. या प्रश्नासंदर्भात सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे. ज्यामध्ये लोकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.


सीबीआय दिल्लीच्या मद्य धोरणाची चौकशी करत आहे. या तपासाअंतर्गत सीबीआयने दिल्ली एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरही सीबीआयने छापा टाकला. यानंतर दिल्लीच्या राजकारणात भूकंप झाला आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये राजकीय युद्ध रंगले आहे. आरोप-प्रत्यारोप आणि प्रश्नोत्तरांचाच्या फेऱ्या देखील दोन्ही पक्षांमध्ये सुरू झाला. याच प्रकरणी दोन्ही पक्षांनी अनेक पत्रकार परिषदाही घेतल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाने याला 2024 ची निवडणूक लढाई असल्याचे म्हटले आहे.


संपूर्ण वादावर सामान्य जनतेच्या मतासाठी सर्वेक्षण


दिल्लीतील मद्य धोरणाच्या या प्रकरणाला नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील युद्धाचे स्वरूप आले आहे. भाजपने याला दारू घोटाळा म्हटले, तर आम आदमी पक्षाने त्याला लोकसभा निवडणुकीशी जोडून मोदी आणि केजरीवाल यांच्यातील लढत बनवली आहे. या साऱ्या भांडणाबद्दल सर्वसामान्यांना काय वाटतं? हा सारा खेळ बघणारे आणि समजून घेणारे मतदार कसे आहेत. हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजच्या सी-व्होटरने देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


दिल्लीतील मद्य धोरणावरून सुरू झालेल्या वादानंतर पंतप्रधान मोदी  (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्यावरून सुरु असलेल्या चर्चेवर एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने (C-Voter) एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात 2102 लोकांनी भाग घेतला. या सर्वेक्षणादरम्यान 2024 मध्ये केजरीवाल मोदींशी स्पर्धा करू शकतील का, असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना 44% लोकांनी होय, असे उत्तर दिले आहे.  तर 56% लोकांनी नाही असे उत्तर दिले. या सर्वेक्षणानुसार अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींना स्पर्धा देण्याच्या बाबतीत अजूनही मागे आहेत.


इतर महत्वाची बातमी: 


Money Laundering Case : मनिष सिसोदियांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल
Congress Bharat Jodo Yatra: काँग्रेसचा 'दिल्ली चलो'चा नारा, भारत जोडो यात्रेची केली घोषणा