Bihar News: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रविवारी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की केली. मात्र या धक्काबुक्की नितीश कुमार यांना कोणतीही दुखापत झाली नाही. सध्या पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते. यादरम्यान ते एका मूर्तीला हार घालण्यासाठी पुढे गेले असता त्याचवेळी जमावातील एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनी लगेच या अज्ञात हल्लेखोराला ताब्यात घेतलं.
सुरक्षा रक्षकाने नितीश कुमार यांचे संरक्षण केले
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाल्याचं समजत आहे. बिहार विधानसभा निवडणूक 2020 दरम्यान मधुबनी येथे झालेल्या निवडणूक सभेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश यांच्यावर कांदे आणि विटांनी हल्ला केला होता. यावेळी मंचावर उपस्थित मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांचं रक्षण केलं होत.
महत्वाच्या बातम्या
Bharat Bandh 2022 : 28 आणि 29 मार्चला भारत बंद, बँकिंग, वाहतुकीसह विविध सेवांना बसणार फटका!
Imtiyaz Jaleel : मला खासदार करण्यासाठी अब्दुल सत्तारांचा सिंहाचा वाटा; जलील यांचा गौप्यस्फोट
Nanded : नांदेडमध्ये बर्निंग ट्रकचा भर रस्त्यात थरार,चालकाचा मृत्यू