परभणी : जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या यादीतील बदल प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावित यादीनुसार होणारे बदल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या शिफारशीसह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे (Election Commission) मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या 36 स्थानांमध्ये बदल करण्यात आले असून, तसेच 17 मतदान केंद्रांच्या नावातील बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच 27 नवीन प्रस्तावित मतदान केंद्र असून, 18 मतदान केंद्रांमध्ये बदल किंवा विलिनीकरण प्रस्तावित आहे. सध्या 1 हजार 554 मतदान केंद्र अस्तित्वात असून, नव्याने 1 हजार 581 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. 
 
या बदलासह अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्राची प्रारूप यादी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारुप यादीवर कोणाला सूचना, आक्षेप किंवा हरकती पुढील सात दिवसांपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमअंतर्गत परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशांनुसार परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये तपशिलानुसार मतदान केंद्रांच्या नावातील बदल, मतदान केंद्रांच्या स्थानातील बदल, विलिनीकरण व नविन प्रस्तावित मतदान केंद्रांचे प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. 


सात दिवसांच्या आत आक्षेप, हरकती स्विकारणार 


ही प्रारुप यादी आज सोमवारी (25 सप्टेंबर) रोजी प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार, नवीन बदलासह अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी आज सोमवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयाच्या Parbhani.nic.in  या संकेतस्थळावर तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान केंद्रांचे प्रारूप यादीबाबत कोणत्याही सूचना, आक्षेप किंवा हरकत असल्यास पुढील 7 दिवसांच्या आत या कार्यालयात स्वितकारण्यात येणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी परभणी यांनी कळविले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Parbhani : ऐन ध्वजारोहणाच्या वेळी वीज खंडीत, मंत्री सावे संतापले, अधिकाऱ्यांची पळापळ; तब्बल अर्ध्या तासांनी वीज सुरळीत