Eknath Shinde Banner : खरी शिवसेना कोणाची हा वाद असतानाच आता शिंदे गटाची (Shinde Group) नजर शिवसेना (Shiv Sena) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघावर (Worli) आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. कारण गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात देखील वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे आधीच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची वरळी मतदारसंघावर नजर असतानाच आता शिंदे गट देखील आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात विशेष रस दाखवत असल्याचं चित्र आहे.
वरळीतील अनेक देवींच्या मंडळांसमोर गेट उभारण्यात आले आहे. या गेटवर तसंच आजूबाजूला लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचे फोटो दिसत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असंल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे वरळीत शिवसेनेच्या बॅनरपेक्षा शिंदे यांचेच बॅनर अधिक असल्याचं दिसत आहे. शिवाय या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो आहे.
गणेशोत्सवातही वरळीत शिंदेंचे बॅनर
याआधी गणेशोत्सवात एकनाथ शिंदे यांचे बॅनर वरळी मतदारसंघात झळकले होते. वरळीचा लाडका मार्केटचा राजा इथे श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे पोस्टर लावण्यात आले होते. कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो होते. त्यामुळे वरळीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा शिंदे गटाचा इरादा असल्याचं म्हटलं जात होतं.
शिवसेनेच्या गडावर शिंदे गटाची नजर
वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. माजी मंत्री आदित्य ठाकरे हे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्त्व करतात. यापूर्वी सचिन अहिर हे वरळी मतदारसंघाचे आमदार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सचिन अहिर शिवसेनेत सामील झाले आणि त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे इथून निवडून आले आणि राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून जबाबदार त्यांच्यावर सोपवण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : Worli मतदारसंघात CM Eknath Shinde यांचे बॅनर, नवरात्रोत्सवाच्या मंडळासमोर बॅनर गेटची उभारणी