Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलेल्या मुलाखतीतील एकूण एक शब्द हा खरा आहे. कारण या सगळ्या घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, अशाच पद्धतीचे वातावरण असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant यांनी केला आहे. ज्या आघाडीमध्ये आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो वापरत मत मागितले, मात्र त्यानंतर काँग्रेस (Congress) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP) बरोबर जाण्याचा निर्णय हा त्यावेळच्या शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतला होता. हा आमच्यासाठी एक मोठा धक्का होता. परंतु ज्या वेळेस आमच्या सर्व आमदारांची चर्चा झाली, त्या चर्चाअंती असा निर्णय झाला की, कायम आम्हाला समजून घेणारे, आम्हाला वेळ देणारे, आमच्या अडीअडचणी सोडवणारे, एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री होत असतील, तर त्यासाठी सर्वांनी निर्णयाला सहमती दर्शवली होती. त्यावेळी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असेच वातावरण असल्याचेही ते म्हणाले. 


मात्र, आयत्यावेळी शरद पवारांच्या सांगण्यानुसार तेव्हाच्या पक्षप्रमुखांनी आपली भूमिका बदलली आणि स्वतःला मुख्यमंत्री करून घेतले. त्यामुळे हा देखील आम्हाला खूप मोठा धक्का असल्याचे म्हणत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज दिलेल्या मुलाखतीत सांगितलेले एकूण एक किस्सा आहे तसाच असून त्यात काहीही वावगं नसल्याचेही ते म्हणाले. 


मुलाखतीतील शब्द अन् शब्द खरा- मंत्री उदय सामंत


महाविकास आघाडी सरकारमध्ये खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) माझ्या खात्यात खूप हस्तक्षेप होता. राज्यसभा उमेदवार निवडीत बाजूला ठेवून कहर केला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत एकनाथ शिंदेंनी यांनी आज एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे उद्धव ठाकरेंना  वाटत होते त्यामुळेच त्यांनी घाई केली असेही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच या मुलाखती मध्ये अनेक गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. त्यांच्या याच वक्तव्याला आता उद्योग मंत्री उदय सामंतांनी दुजोरो देत तेव्हा असेच झाले असल्याचे सांगितले आहे.


महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला समाधानकारक


आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीतील जागावाटपाबाबत मंत्री उदय सामंतांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीमध्ये शिवसेनेला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. शिंदे साहेबांसोबतच्या उठावात तेरा खासदार होते, त्या जागा मिळाल्याच आहे. मात्र, अजून तीन जागा मिळत असेल तर 16 जागा समाधानकारक आहे. दोन पक्षाची युती झाल्यास 21 किंवा 22 जागा ठीक होत्या. मात्र, आता अजित पवार यांची राष्ट्रवादी सोबत आल्याने त्यांनाही समान वाटा दिला पाहिजे. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जो सन्मान पूर्वक जागा वाटपाचा फॉर्म्युला वापरला आहे. तो समाधानकारक असल्याचेही उदय सामंत म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या