मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि निकालानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. पक्षफुटीनंतर ज्या आमदारांनी ठाकरे गटाला टोकाचा विरोध किंवा विरोधात कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया दिलेली नाही,  शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली त्यांचाच विचार केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच कारणामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या किती आमदार आहेत. ते आमदार कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात असून आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार का? असे विचारले जात आहे. 


एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार (Shiv Sena MLA With Eknath Shinde)


1)  एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
2) अनिल बाबर (Anil Babar) (निधन- जागा रिक्त)
3)  शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai)
4) महेश शिंदे (Mahesh Shinde)
5) शहाजी पाटील  (Shahaji Patil)
6) महेंद्र थोरवे (Mahendra Thorve)
7) भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale)
8) महेंद्र दळवी (Mahendra Dalawi)
9) प्रकाश अबिटकर (Prakash Abitkar)
10) डॉ. बालाजी किणीकर (Balaji Kinikar)
11) ज्ञानराज चौगुले (Dyanraj Chaugule)
12) प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare)
13) तानाजी सावंत (Tanaji Sawant)
14) संदीपान भुमरे (sandipan Bhumare) (खासदार म्हणून निवड)
15) अब्दुल सत्तार नबी (Abdul Sattar)
16) प्रकाश सुर्वे (prakash surve)
17) बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar)
18) संजय शिरसाट  (Sanjay Shirsat)
19) प्रदीप जयस्वाल (Pradip Jayswal)
20) संजय रायमुलकर (sanjay Raymulkar)
21) संजय गायकवाड  (Sanjay Gaikwad)
22) विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir)
23) शांताराम मोरे (Shantaram More)
24) श्रीनिवास वनगा (shrinivas Wanga)
25) किशोरअप्पा पाटील (Kishor Patil)
26) सुहास कांदे (Suhas Kande)
27) चिमणआबा पाटील (Chiman Aaba Patil)
28) सौ. लता सोनावणे (Lata Sonawane)
29) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)
30) सौ. यामिनी जाधव (Yamini Jadhav)
31) योगेश कदम (Yogesh Kadam)
32) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
33) मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar)
34) सदा सरवणकर (Sada Sarvankar)
35) दीपक केसरकर(Dipak Kesarkar)
36) दादा भुसे (Dada Bhuse)
37) संजय राठोड (Sanjay Rathod)


38) संतोष बांगर (Santosh Bangar)


39) रविंद्र वायकर (Ravindra Waikar) (खासदार म्हणून निवड)


हेही वाचा :


Maharashtra News LIVE Updates : मोठी बातमी! शिंदे गटाचे सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ