Mumbai : शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर मुंब्रा येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शाखेवरती ताबा घेण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या मुंब्रातील शाखेवरती आपल्याला पाहायला भेटला होता. विशेष म्हणजे मुंब्रातील या शाखेला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्याचबरोबर विरोधी पक्षाचे अनेक नेत्यांनी देखील भेट दिली होती. परंतु आज पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादग्रस्त शाखेला भेट दिली आहे. आम्ही समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही काम केलं आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक आपल्या सोबत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.  


मतदान लोकशाहीचा हा पवित्र अधिकार आहे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मतदान लोकशाहीचा हा पवित्र अधिकार आहे,त्यामुळे आपण सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सर्वांना विकास हवा आहे आणि विकास करणार,आमचा सरकार आहे. आमचा अजेंडा हा विकासाचा आहे. टोरेंट विद्युत कंपनी बाबत अनेक तक्रारी मला कळाल्या आहेत, आमचं सरकार सामान्य नागरिकांसोबत आहे. निवडणुका होताच टोरंट बाबत आम्ही बैठक घेऊन लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ, असेही शिंदे यांनी सांगितले आहे. 


राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान


मुंबईतील 6 मतदारसंघांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सोमवारी (दि.19) पार पडणार आहे.  हा महाराष्ट्रातील मतदानाचा पाचवा टप्पा आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंब्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. कल्याण लोकसभेत समावेश असलेला मुंब्रा एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिदेंसाठीही हा मतदारसंघ महत्वाचा आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सोमवारी पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेले मतदारसंघ मानले जातात. त्यामुळे शिंदेंचा दौरा महत्वाचा मानला जातोय. ठाण्यातून नरेश म्हस्के हे उमेदवार आहेत, तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. 


राज्यातील 13 जागांसाठी होणार मतदान 


मुंबईतील 6 जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना वि. शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती. 


मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार रिंगणात 


मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाकडून 2 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित 4 जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोनहात करणार आहेत. महायुतीमध्ये 3 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने शड्डू ठोकला होता. 


मुंबईतील 6 जागांवर कोणाला उमेदवारी ? 


दक्षिण मुंबई-  अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव - शिवसेना विरुद्ध शिवसेना 


दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई - शिवसेना विरुद्ध शिवसेना 


उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील - भाजप विरुद्ध काँग्रेस 


उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड - भाजप विरुद्ध काँग्रेस 


उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील - भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना 


वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर - शिवसेना विरुद्ध शिवसेना 


इतर महत्वाच्या बातम्या 


पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 20 मे ला मुंबईतील 6 जागांसह राज्यातील 13 जागांसाठी मतदान