Shivsena Party Hearing : शिवसेना पक्ष (Shivsena Party) आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर सुनावणी कधी होणार याबाबत सर्वांनाचं प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. आता यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी सुनावणी होणार आहे. कामाच्या शेवटच्या दिवशी तरी CJI काही महत्त्वाचे निर्देश देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यादिवशी ते काही महत्वाचे निर्णय घेणार आहेत. यातीलच एक अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर असलेली सुनावणी. या निर्णयाकडं संपूर्ण देसाचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर अलीगट मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा, मदरसा कायद्याची वैधता, सरकारी संपत्तीचे पुनर्वितरण, वाहन परवाना कायदा तसेच सरकारी नियुक्ती प्रक्रियेतील नियमांबद्दलच्या विषयांवर निर्णय देणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Shivsena : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता