Keshav Upadhyay on Satej Patil : सतेज पाटील (Satej Patil) यांनी काल महिलेचा अपमान केला आहे. त्यांनी छत्रपती यांच्या गादीचाही अपमान केला असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय (Keshav Upadhyay) यांनी केली आहे. कालच्या घटनेनंतर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) महिलाबद्दलची भूमिका कळली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत कडक कारवाई केली पाहिजे असेही केशव उपाध्याय म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते सतेज पाटील?
कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडे उमेदवारच राहिला नाही. त्यानंतर मात्र सतेज पाटील हे चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. 'दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद' असं म्हणत सतेज पाटलांनी त्यांचा राग व्यक्त केला. याच मुद्यावरुन विरोधकांनी सतेज पाटील यांचा्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचं चित्र दिसत आहे.
सतेज पाटलांची पुढची भूमिका काय?
मी कालच्या विषयावर पडदा टाकला आहे. जे घडलंय त्यावर बोलण्यात अर्थ नाही. आता इथून पुढे कसं जावं, याबाबत मी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. काल जे घडलंय त्यावर बोलण्यात अर्थ नाही. इंडिया आघाडीचे घटकपक्ष लोकसभा निवडणुकीत एकत्र होते, त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. आता विधानसभेलाही घटकपक्षांनी मदत करावी, ही अपेक्षा आहे. आम्ही आता एकमेकांशी बोलून पुढील दिशा निश्चित करु, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
शाहू महाराजांबद्दल आदर, छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवणे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य
मधुरिमाराजे यांच्या उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयाविषयी बोलण्यास सतेज पाटील यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी म्हटले की, आता मला कुठलाही वाद निर्माण करायचा नाही. आता पुढे जाणं, हाच एकमेव मार्ग आहे. सगळ्या गोष्टी घडून गेल्यात त्यावर मी आता बोलणे सयुक्तिक नाही. आम्ही आज संध्याकाळपर्यंत कोल्हापूर उत्तरमधील आमची भूमिका स्पष्ट करु. मी काल गारगोटीवरुन येताना शाहू महाराजांशीही चर्चा केली आहे. मला आता कोणावरही वैयक्तिक टीकाटिप्पणी करायची नाही. घडून गेलेल्या घटनेबाबत बोलून वाद निर्माण करण्यात अर्थ नाही. मला शाहू महाराजांबद्दल आदर आहे. छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवणे, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. मी आता कोणावरही टीका करणार नाही.
महत्वाच्या बातम्या: