Chhagan Bhujbal : 17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून (OBC Mahaelgar Melava) केला होता. भुजबळांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. आता भुजबळ यांनी एक्सवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. 


या पोस्टमध्ये छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवला आहे. तसेच त्यांनी अहमदनगर (Ahmednagar) येथे झालेला मेळावा हा भविष्यातील मोठ्या क्रांतीची बीजे ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रविवारी रात्री नाशिकहून मुबंईला रवाना झाल्यानंतर भुजबळ यांनी एक्सवर ही पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या मनात नेमकं काय सुरुय? अशा चर्चांना उधाण आले आहे. 


एक्सवर छगन भुजबळ म्हणतात, 


अहमदनगरच्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यातून पुन्हा एकदा आपण सरकारच्या बेबंदशाही विरोधात, भेदभावाविरोधात आणि राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांसाठी आवाज उठवला! हा मेळावा म्हणजे भविष्यातील एका मोठ्या क्रांतीची बीजे ठरणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना टोला


एवढा मोठा मंत्री असून झोपेतून उठल्या सारखं बोलत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचा भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. गोरगरीब लोकं मेले पाहिजे असे भुजबळ यांचे विचार असून, मग मराठा असो की ओबीसी असो, ज्यांचे त्यांचे विचार असतात. ओबीसी-मराठा एकत्र डीजे लावून नाचत आहेत. ज्या पक्षात जाणार त्यांना अडचणीत आणण्याची भुजबळ यांची सवय आहेत. भुजबळ कोणत्या पक्षात जावे आम्हाला काही देणघेणे नाही. राजीनामा दिला तर आम्हाला काय करायचं, राजीनामा द्यावा अन्यथा काही करो आम्हाला काहीच देणघेण नाही. राजीनामा दे नाहीतर डोक्यावर घेऊन फिर, राजीनामा देऊन उपकार केले नाही. शेरोशायरी करणारे भुजबळ दुकान टाकून तीन-तीन रुपये जमा करणार का? असा खोचक टोलाही जरांगे यांनी लगावला. 


भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये - बबनराव तायवाडे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने (Rashtriya OBC Mahasangh) केली आहे. भुजबळ यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर, ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचं रक्षण करेल, रस्त्यावर उतरेल, भुजबळांच्या राजीनाम्यावर ओबीसी महासंघाने ही भूमिका घेतली आहे. ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी एबीपी माझासोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.


आणखी वाचा 


आधी पार्थ पवार, आता श्रीकांत शिंदेंचा गुंडासोबतचा फोटो व्हायरल; संजय राऊत म्हणतात...