Chhagan Bhujbal on SIT : राज्यातील आरक्षण आंदोलनादरम्यान गेल्या महिन्यांत झालेल्या हिंसक बाबींची राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीये. ते मुंबईत बोलत होते.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले, चांगला निर्णय आहे, SIT नेमली आहे. कोणी दगड मारले किंवा मारायला लावले याचीही चौकशी व्हावी. संपूर्ण बीड पेटलं, आमदारांची घर पेटवली, शिक्षण संस्था पेटवल्या. मी आणि देवेंद्र फडणवीस यांचे टार्गेट होतो. अनेक बसेस पेटवल्या, कोण पेटवायला लावल्या, याची चौकशी झाली पाहिजे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
निवडणुका जवळ आल्या आहेत. मराठा समाजाचे अनेक खासदार, मंत्री आहेत . मात्र, बोटावर माजण्या इतके जरांगे यांचे काही कार्यकर्ते भीती निर्माण करत आहेत. या साठी सगळ शोधून काढलं पाहिजे. कोण आहेत हे दगड फेक करणारे लोक? अनेक लोक यामध्ये सहभागी आहेत, असे आरोपही भुजबळ यांनी केले.
कारवाई झाली पाहिजे
अनेक लोक या हिंसाचारात सहभागी होते. मी आणि देवेंद्र फडणवीस हे टार्गेट होते त्यांचे टार्गेट होतो. आता कारवाई झाली पाहिजे. आता लवकरात लवकर सत्य शोधून काढले पाहिजे. राजकीय supoort होता का कुठून पैसा आला याची देखील चौकशी झाली पाहिजे, असे आरोपही छगन भुजबळ यांनी केले.
एसआयटी चौकशीतून कशाचा तपास होणार?
राज्यात आरक्षणासाठी विविध आंदोलने करण्यात आली होती. ही आंदोलने सुरु असताना गैरफायदा घेऊन सामाजिक सलोखा बिघडवणे. वातावरण अस्थिर करण्यासाठी जाळपोळ आणि हिंसक घटना जाणिवपूर्वक घडवणे. सोशल मीडियाचा आणि माध्यमातून चुकीची माहिती आणि अफवा पसरवणे. अफवा पसरवून दंगे भडकवण्याचा प्रयत्न करणे, या बाबींचा तपास एसआयटीकडून करण्यात येणार आहे. शिवाय, तपासाचा अहवाल 3 महिन्यांमध्ये सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
विधानसभा अध्यक्षांकडून एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश
महाराष्ट्र विधानमंडळाच्या 2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आरक्षणादरम्यान झालेली हिंसा पूर्व नियोजित होती का? याबाबत चर्चा झाली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात यावी, असे निर्देश दिले होते. त्या निर्देशांनुसार नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
इतर महत्वाच्या बातम्या