Chhagan Bhujbal on Baban Shinde, सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात (Solapur) राजकीय घडामोडींना वेग आलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी शनिवारी (दि.4) काँग्रेसच्या स्टेजवर उपस्थिती लावली. राजन पाटील फक्त उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांनी पुढील 2 ते 3 महिन्यात दिलीप माने (Dilip Mane) यांना आशीर्वाद देण्याचे आवाहनही केले. दरम्यान, आज सकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे (Baban Shinde) यांनी थेट पुण्यातील (Pune) मोदी बाग गाठली. बबनदादा शिंदे (Baban Shinde) यांनी मोदी बागेत शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात घरवापसीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान याबाबत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


छगन भुजबळ काय काय म्हणाले? 


बबनदादांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले, कोणीही घर वापसी करणार नाही. वैयक्तिक कामासाठी लोक भेटत असतात.  शरद पवार देखील कामांसाठी विविध पक्षांच्या नेत्यांकडे पळत असतात असाही खुलासा त्यांनी केला. त्यामुळे बबनदादा शिंदे अजित पवारांची साथ सोडणार नाहीत, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. 


काही दिवसांपूर्वी रमेश शिंदे यांनी दिल्लीत सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्यामुळे आमदार बबनराव शिंदेंच्या घरात राजकीय फुट पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. माढा विधानसभेसाठी यंदा आमदार बबन शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदे यंदा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता बबन शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने ते पुन्हा घरवापसी करणार असल्याच्या चर्चा आहेत. 


जे लोक आरक्षण कशासाठी हे समजतात त्याचे कायदे समजतात त्या कोणाशीही मी बोलण्यास तयार 


पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, जे लोक आरक्षण कशासाठी हे समजतात त्याचे कायदे समजतात त्या कोणाशीही मी बोलण्यास तयार आहे. मनोज जरांगेंशी चर्चा करणार का या प्रश्नावर भुजबळांनी दिले थेट उत्तर  दिले. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिलेल्या ढेकणाच्या उपमेनंतर आता निवडणुकीत विविध प्राणीमात्रांवर असेच हल्ले होताना दिसतील, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. महाराष्ट्राने अशी तात्कालिक वादळे खूप बघितली आहेत. मात्र आपल्याला संत परंपरेचा वारसा आहे त्यामुळे काही दिवसांनी सर्व व्यवस्थित होईल, अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केला


इतर महत्वाच्या बातम्या 


Rajan Patil : राजन पाटील थेट काँग्रेसच्या स्टेजवर, दिलीप मानेंचा वादळी नेतृत्व म्हणून उल्लेख, येणाऱ्या 2-3 महिन्यांत मानेंना आशीर्वाद देण्याचं आवाहन