Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शनिवारी (दि. 10) राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तोफ डागली. 


कलंक, फडतूस नव्हे हे तर मनोरुग्ण गृहमंत्री असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना एक्स या सोशल मिडिया माध्यमावरून प्रत्युत्तर दिले आहे. 


एक्सवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,  


मुर्खांच्या नंदनवनात वावरणारे सदैव मनोरुग्णालयातच असल्यासारखे वागतात...परिणामी त्यांच्या संगतीत न राहणे पसंत करुन सहकारी सोडून जातात... असो, आपली मानसिक अवस्था आम्ही समजू शकतो. पण, त्याचा अर्थ इतरांनाही तसेच समजण्याची गरज नसते. ज्यांनी 2.5 वर्ष ‘वसुलीची गॅरंटी’ दिली, त्यांनी ‘मोदी गॅरंटी’वर बोलायचे नसते.


आमची तुम्हाला विनंती आहे, या मानसिक धक्क्यातून स्वत:ला सावरा आणि मनसुख हिरेन, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं, वाझे, 100 कोटींची वसुली, पत्रा चाळीतून मराठी माणसांची लूट, सोशल मीडियातून लिहिणार्‍यांना घरात बोलावून मारहाण, कोविड काळात पत्रकारांना जेल, याकुबच्या कबरीवर रोषणाई, पालघर साधू हत्याकांड, खिचडी घोटाळा, इतके वर्ष मुंबईकरांची लूट, सत्ता टिकविण्यासाठी दिल्लीत मुजरे करण्यावर एकदा मनसोक्त बोला.त्यातच तुमच्या या अवस्थेचा उपचार दडला आहे. बाकी आमची शब्दसंपदा मोठी आहे. पण, आमची ती संस्कृती नाही! ज्यांना संवेदनशील मन नाही त्यांच्या मानसिक आरोग्यावर आम्ही काय बोलणार? असे प्रत्युत्तर त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे


फडणवीस यांना मी याआधी कलंक फडतूस शब्द वापरले. मात्र आता गृहमंत्री मनोरुग्ण म्हणून लाभला आहे का? फडणवीस असे बोलले की, श्वान गाडीखाली आला तर राजीनामा देऊ का म्हणाले. कुत्रा काय सगळ्या प्राण्यांची जबाबदारी तुमची आहे. दिल्लीश्वरांसमोर तुम्ही कुत्र्यासारखी शेपटी हलावतात, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 


सरकारमध्ये गँगवॉर सुरू - उद्धव ठाकरे 


डोळ्यांसमोर जी बेबंदशाही सुरू आहे, यामुळे महाराष्ट्रातील जनता दुखवली गेली आहे. सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे. गणपत गायकवाड यांचा सीसीटीव्ही न मागता समोर आला. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. गणपती सर्जनाच्या वेळी एका आमदाराने गोळीबार केला त्याला क्लिनचीट मिळाली. बोरीवली येथील आमदाराच्या मुलाने एकाचे अपहरण केले त्यांच्यावर देखील काहीच झालेले नाही. निखिल वागळे,असिम सरोदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, याबाबत पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Uddhav Thackrey on Devendra Fadnavis : कलंक, फडतूस नव्हे हे तर मनोरुग्ण गृहमंत्री, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर जहरी वार