भाजपकडे मोदी-फडणवीसांसारखे मोठे नेते असले तरी निवडणूक जिंकायला त्यांना काँग्रेसवालेच लागतात: हर्षवर्धन सपकाळ

Pune : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला फोडा, रिकामी करा असा कानमंत्र देत सूचना केल्या आहेत. तर यावर भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिलीय.

Continues below advertisement

Maharashtra Politics पुणे : तुमच्या सारखे कार्यकर्ते पार्टीजवळ आहेत म्हणून पार्टी मजबूत आहे. इथून पुढे ही पार्टी वाढवणार आहे. त्यामुळे संग्राम थोपटे सारखे जेवढे काही दिसतील तेवढे आपण घेऊन येणार आहे. किंबहुना तुम्ही काँग्रेस (Congress) पार्टी खाली करून टाका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. तुम्ही याची अजिबात काळजी करु नका की ते आले तर माझं काय होईल? तुमच्याकडे देवेंद्रजी आहेत, मी आहे, मुरली अण्णा मोहोळ आहेत आम्ही तुम्हाला न्याय देणार असल्याचे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. पुणे (pune) भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असा मंत्र त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. 

Continues below advertisement

तर दुसरीकडे याच वक्तव्याचा काँग्रेसकडून जोरदार समाचार घेत प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे. विरोधकांना फोडण्याचं जे भाजप प्रयत्न करताय त्याचा आम्ही निषेध करतो. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे मोठे नेतृत्व सांगणारे नेते त्यांच्याकडे आहेत. परंतु ते काँग्रेसच्या भरवशावर निवडणुका जिंकतात हा विश्वास भाजपमध्ये आहे. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी भाजपवर टीका केली आहे.  

भाजप ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेटकीण- हर्षवर्धन सपकाळ

भाजप ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. तसेच त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे जरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सारखे मोठे नेतृत्व सांगणारी जोडी असली तरी निवडणूक ही काँग्रेसच्याच नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या जातात, याचा त्यांना विश्वास आलाय. त्यामुळे ते विरोधकांना फोडण्याचं षड्‍यंत्र रचत आहेत. ज्याचा आम्ही निषेध करतो. असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परभणीत केलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस फोडण्याच्या केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. महत्त्वाचं म्हणजे शंकराचार्य यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्याच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

भाजपा जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतीय जनता पार्टीही आपल्या कार्यकर्त्याचा पहिला विचार करते आणि नंतर इतरांचा. राहुल कुल यांनी संग्राम थोपटे यांचे जमवून आणलं. विधानसभेच्या 115 जागा भाजपला पूर्ण करायचा आहे. तसेच जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे आणायचे आहे. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आपला पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वच पक्ष पक्षप्रवेश करून घेत असतात. विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही. काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिले नाही. शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही. उद्धव ठाकरेंचा शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत त्यांना त्यांची पार्टी संभाळता येत नाही तर आम्ही काय करावं, असं बावनकुळे म्हणाले.पुण्यात भाजपचं कार्यकर्ता संवाद आणि बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडली या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

हे ही वाचा 

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola