Municipal Elections 2025 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे पक्ष हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षाशी युतीची प्रस्ताव स्वीकारणार का? की दोन्ही बंधुच या एकत्र येण्याचा मार्ग मोकळा करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षातील नेते युतीबाबत सातत्याने सकारात्मक वक्तव्ये करत आहेत. अशातच आगामी महापालिकेसाठी दोन्ही बंधु एकत्र आले तर ऐकूनच  राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागू शकतं, असं मतही जाणकार व्यक्त करत आहे. अशातच या संभाव्य युतीचा विदर्भातील चारही महापालिकांमध्ये नेमका काय फरक जाणवून येईल? संभाव्य युतीचा विदर्भात कुणाला फायदा होईल, तसेच चारही महापालिकांमध्ये कोणाचे बलाबल आहे? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.  

पुर्व विदर्भ :

1) नागपूर : मनसे : 00उबाठा : 02

2) चंद्रपूर :मनसे : 02 उबाठा : 02 (यातील 1 जण भाजपात गेला)

पश्चिम विदर्भ :

3) अमरावती : मनसे : 00उबाठा : 04शिंदे गट : 03

4) अकोला :मनसे  : 00उबाठा : 06शिंदे सेना : 02

विदर्भातील उबाठा आणि शिवसेनेच्या संभाव्य राजकीय युतीचे फायदे-तोटे :

- मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकच्या तुलनेत दोन्ही पक्षांची विदर्भात संघटनात्मक स्थिती अतिशय कमकुवत. - पूर्व विदर्भात ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमी. तर चंद्रपूरचा अपवाद‌ वगळता मनसेची कुठेही राजकीय ताकद नाही. - नागपूर शहरात दोन्ही पक्ष अतिशय क्षीण. - दोन्ही पक्षांकडे पूर्व विदर्भात कोणताही मोठा नेता नाही. - पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात ठाकरे गटाची परिस्थिती चांगली. पश्चिम विदर्भात ठाकरे गटाचे 4 आमदार. - अकोला आणि अमरावतीत ठाकरे गटाचे चांगले संघटन.- अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातून ठाकरे गटाचा प्रत्येकी एक आमदार. - ठाकरे गटाकडे पश्चिम विदर्भात आमदार नितीन देशमुखांसारखा 'फायर ब्रँड' नेता. मनसेकडे यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर हा पश्चिम विदर्भातला एकमेव चेहरा. - तर पश्चिम विदर्भात अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी भागात मनसेचे संघटन. - अकोला महापालिकेत 2007 आणि 2012 मध्ये मनसेचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता.  2017 मध्ये अकोल्यात मनसेचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. - विदर्भात ठाकरे गटाला मनसेपेक्षा काँग्रेस सोबतची आघाडी अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता.- विदर्भात भाजप पर्यंत काँग्रेसची मोठी राजकीय ताकद आणि संघटन. - मनसे सोबतच्या राजकीय युतीचा शिवसेनेच्या ठाकरे गटाला विदर्भात फायदा होण्याची शक्यता फार कमी.

हे ही वाचा