Chandrashekhar Bawankule and Suresh Dhas, Beed : दोन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले. राज्यभरात धनंजय मुंडेंविरोधात राळ उठवली. धसांकडून मुंडेंवर सातत्याने आरोपांची मालिका सुरु असताना आज (दि.14) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्त्वाचे खुलासे केले. त्यामुळे सुरेश धस यांची अडचण झाली. एकीकडे सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले असताना चंद्रशेखर बावनकुळेंच्या मध्यस्थीने दोघांमध्ये समेट घडून आलाय का? अशी चर्चा सुरु झाली. त्यामुळे यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सुरेश धस यांना अक्षरश: दोन पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? आणि त्यावर सुरेश धस यांनी कोणतं स्पष्टीकरण दिलं? जाणून घेऊयात....
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि सुरेश धस (Suresh Dhas) दोघेही इमोशनल आहेत. दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्या मतभेद आहेत, मनभेद नाहीत.
सुरेश धस पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
सुरेश धस म्हणाले, मी क्लियर कट सांगतो मी बावनकुळे यांच्या घरी जेवायला गेलो होतो...पर्वा रात्री मी धनंजय मुंडेंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि परत घरी आणलं तेव्हा मी भेटायला गेलो. काल मी 78 कोटींचा घोटाळा काढला, कृषी विभागात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करा म्हणून मी पत्र दिलं....आजच मी धनंजय देशमुख यांना आणि त्यांच्या मेव्हन्यांना भेटलो. आमच्यात मतभेद आहे मन भेद नाही.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, धनंजय मुंडे यांना मी बोललो बावनकुळे ही बोलले मी त्यांना स्पष्ट सांगितलं. मी देशमुख प्रकरणात माघार घेणार नाही असं त्यांना स्पष्ट सांगितलं मी माघार घेणार नाही. मनोज जरांगे आमचे दैवत आहेत, त्यांनी काय बोललं या बाबत मी भेटून स्पष्ट करेल... बावनकुळे यांनी मला विचारलं, तुमच्यात मन भेद आहेत का? मी स्पष्ट सांगितलं नाही. त्यांनी मिटवण्याचं ही बोलले मी त्यांना स्पष्ट सांगिलतं चौकशीत जे येईल ते समोर येईल.
धनंजय मुंडे ही म्हणाले मिटवून घ्या त्यांना ही सांगितलं चौकशीत दोषी असाल तर कारवाई होईल...मी धनंजय मुंडे यांना दोन वेळा भेटलेलो नाही, त्यांनी मला विचारलं यात मिटल का? मी त्यांना स्पष्ट सांगितलं मिटणार नाही. मी काल माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो. कुणी बातमी लीक केली, मी कामा निमित्त गेली होतो. अजित पवार यांना विचारा धनंजय मुंडे यांच्या कृषी घोटाळ्याचे पत्र दिलं, असंही सुरेश धस म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या