सोलापूर:  भाजप (BJP) नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना धक्कादायक वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मी राज्याचा अध्यक्ष होतो. 33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहित आहे.  पण मला खात्री होती हेही दिवस जातील आणि ते दिवस गेले कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, असं धक्कादायक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. 


चंद्रकांत पाटील म्हणाले,  सोलपूरची निवडणूक कठीण नाही आहे. माढ्याची निवडणूक कठीण नाही ती कठीण केली आहे. ईश्वराला सगळ्यांची काळजी आहे. तो त्याचे संतुलन बरोबर करत असतो. मी राज्याचा अध्यक्ष होतो 33 महिने आम्ही काय सहन केल आहे हे आम्हाला माहित आहे. पण मला खात्री होती हे देखील दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. त्यामुळे चांगले काम करत राहा. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते.  


देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती...


देवेंद्र फडणीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती मी राज्याचा अध्यक्ष होतो 33 महिने आम्ही काय सहन केल आहे हे आम्हाला माहित आहे कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीस यांना अटक झाली असती. पण मला खात्री होती हेही दिवस जातील आणि ते दिवस गेले कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीच्या राज्यातील सत्तेच्या काळात अशी वेळ आली होती असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.


माढ्याची निवडणूक कठीण नव्हती ती कठीण केली


या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरची निवडणूक इतकी  कठीण नाही मात्र माढ्याची निवडणूक कठीण नव्हती ती कठीण केली गेल्याची कबुलीच दिली . विशेष म्हणजे Abp माझा च्या सर्व्हेत सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते आघाडीवर असल्याचे दाखवले असून माढा लोकसभेतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचे दाखवले आहे . सर्वेवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील याना सर्वेतील वास्तव भाषणात मान्य करावे लागले आणि बोलण्याच्या ओघात त्यांनी हे वास्तव शिवसैनिकांच्या समोर बोलून दाखवले . 


हे ही वाचा :


भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय', शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप