Jharkhand Assembly Trust Vote: झारखंडचे मु्ख्यमंत्री चंपई सोरेन (Champai Soren) यांनी विश्वासदर्शक ठरवा जिंकला. झारखंड विधानसभेत (Jharkhand Vidhan Sabha) झालेल्या बहुमत चाचणी अर्थात फ्लोअर टेस्टमध्ये सोरेन सरकार पास झालं. चंपई सोरेन यांच्या समर्थनार्थ 47 मतं मिळाली, तर विरोधात 29 मतं गेली. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना जमीन घोटाळाप्रकरणात मनी लॉड्रिंगप्रकरणात ईडीने 31 जानेवारीला अटक केली, त्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. या बहुमत चाचणीला हेमंत सोरेन देखील उपस्थित होते, यावेळी त्यांनी भावनिक भाषण केलं. झारखंड मुक्ती मोर्चा (Jharkhand Mukti Morcha) अर्थात JMM नेतृत्त्वातील 40 आमदार थेट हैदराबादमध्ये गेले होते. त्यानंतर काल रात्री ते रांचीला परतले.
बहुमत सिद्ध करण्यासाठी दिला होता दहा दिवसांचा वेळ
झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) उपाध्यक्ष चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून 2 फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अटक केली, त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (2 फेब्रुवारी) चंपई सोरेन (Champai Soren Jharkhand CM) यांना पद आणि गोपनियेतेची शपथ दिली होती. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ दिला होता.
झारखंडमधील पक्षीय बलाबल कसं आहे?
81 सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 48 आमदार आहेत. यामध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाकडे 29, काँग्रेसकडे 17, RJD कडे एक आणि CPI (ML) कडे एक आमदार आहे.
विरोधी पक्ष एनडीएकडे 32 आमदार आहेत. यामध्ये भाजप 26, AJSU 3, NCP (AP) 1 आणि 2 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तसेच एक जागा रिक्त आहे.
कौटुंबिक विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत
हेमंत सोरेन यांना अटक होणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रं देण्यासाठी हालचाल सुरू केली. पण हेमंत सोरेन यांचे लहान बंधू आणि हेमंत सोरेन यांच्या मोठ्या भावाची पत्नी सीता सोरेन यांच्या विरोधामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत, असं सांगण्यात येतंय.
झारखंड जमीन घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय?
ईडीनं रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या 4.55 एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीनं रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रं आणि मोबाईलही त्यावेळी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आपला मोर्चा हेमंत सोरेन यांच्याकडे वळवला.
हेही वाचा: