मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Election 2024) सध्या राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारांनी नावे जाहीर करण्यात येत असून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने (BJP) 'अबकी बार 400 पार' चा नारा दिला आहे. भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने देशातील सुमारे 90 टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महत्त्वाचं म्हणजे भाजपने 100 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे.
भाजपचा 100 विद्यमान खासदारांना दणका
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचं 400 पारचं लक्ष्य आहे. यासाठी भाजपने योजना आखली आहे, या योजनेसाठी भाजपने 100 खासदारांना झटका दिला आहे. भाजपेन आगामी लोकसभेसाठी 100 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. 100 विद्यमान खासदारांवर निवडून येण्याबाबत साशंकता असल्याने भाजपने खासदारांना दुसरी संधीच दिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या 100 खासदारांना मोठा दणका बसला आहे.
विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं
भाजपने आतापर्यंत 90 टक्के मतदारासंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 402 उमेदवारांना खासदारकीचं तिकीट दिलं आहे. आगामी निवडणुकीत भाजप 440 ते 450 जागांवर उमेदवार मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने 100 जागांवरील विद्यमान खासदारांना दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही. यावरुन 400 पार जागांसाठी भाजपचं नियोजन चोख झालेलं असल्याचा अंदाज येऊ शकतो.
400 पारसाठी भाजपचा प्लॅन
भाजपने मित्रपक्ष वगळता स्वत:च्या बळावर 370 जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तर मित्रपक्षांसोबत 400 हून अधिक जागांवर विजय मिळवण्याची भाजपला अपेक्षा आहे. यामुळे भाजपने सध्याच्या 100 खासदारांना दुसरी संधी ने देता त्यांचं तिकीट कापलं आहे. भाजपने 400 हून अधिक जागांवरील उमेदवार जाहीर केलं असून इतर उमेदवारांची घोषणाही लवकरच करण्यात येईल. भाजप सुमारे 450 जागांवर लढणार असून 80 टक्के जागांवर विजयाची अपेक्षा बाळगून आहे. त्यासाठी भाजपने अत्यंत विचारपूर्वक उमेदवार निवडले आहेत. आता प्रचारासाठी एक महिन्यापेक्षा कमी वेळ उरला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :