Sanjay Raut On Shiv Sena: ''जशी भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे. तशीच शिवसेनेला उद्धव ठाकरे यांनी गरज आहे,'' असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एबीपी न्यूजच्या 'प्रेस कॉन्फरेन्स' या कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.


पक्षाचं चिन्ह गेलं तर जाऊद्या, सर्व परिणामांसाठी आम्ही तयार: राऊत 


संजय राऊत म्हणाले की, ''जरी काही खासदार आणि आमदार पक्षाला सोडून गेले असले तरी शिवसेनेतील संघटन हे आमच्यासोबत आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी खोटी शिवसेना बनवण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब असतानाही असे प्रयत्न झाले.'' शिवसेनेचं निवडणूक चिन्ह जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, गेलं तर जाऊद्या. आम्ही सर्व परिणामांसाठी तयार आहोत. कोणत्याही संकटाला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. शिवसेना पुन्हा एकदा वर येईल.'' 


'भाजपला जशी मोदींची, तशीच शिवसेनेला ठाकरेंची गरज'


शिवसेना पक्षासाठी ठाकरे इतके गरजेचे का आहेत? असा प्रश्न त्यांना विचारला असता राऊत म्हणाले की, ''भाजपला जशी मोदींची गरज आहे. तशीच शिवसेनेला ठाकरेंची गरज आहे. आजच्या तारखेत मोदी यांना वगळता भाजपचं अस्तित्व पाहता येईल का? आज जो भाजपचा विस्तार झाला आहे. ही नरेंद्र मोदी यांची ताकद आहे. तशीच शिवसेनेत ठाकरे यांची आहे. प्रत्येक पक्षात एक नेता असतो. मग तो पक्षाचा असो की, कुटुंबातून आलेला किंवा बाहेरचा.'' 


'शिंदे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही'


एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना नेते म्हणून स्वीकारलं तर दोन्ही गट एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नावर ते म्हणाले की, ''तो विषय आता संपला आहे.'' ते म्हणाले, ''त्यांना पक्षात पुन्हा आणण्यासाठी आम्ही आणि उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले. मात्र शिंदे आता जिथे गेले आहेत, त्यांच्या हातात आता काही उरलं नाही. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही.''   


अनेक आमदारांनी असा आरोप केला आहे की, ''संजय राऊत यांच्यामुळे पक्षात फूट पडली. या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, मी पक्षाचा मालक नाही. मी पक्षाचा एक नेता आहे. मी कधी सत्तेत पद घेतलं नाही. मी नेहमीच पक्षासोबत सोबत राहून संघटन आणि सामनाचं काम केलं आहे. हे जे आमदार आहेत, त्यातील काही आमदार माझे चांगले मित्र आहेत. यातील बऱ्याच लोकांचं आयुष्य आम्हीच घडवलं आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांना सांगून मंत्री देखील बनवलं. आता ते जे बोलत आहेत, यामागे त्यांची मजबुरी आहे. मी त्यांना समजू शकतो. मी त्यांच्याविरूद्ध  काही बोलणार नाही.''   


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी: औरंगाबादच्या शिवसेनेच्या लोकसभा जागेवर 'भाजप'चा दावा
Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना शपथविधीचाच विसर पडला? सुधीरभाऊंचा कॅबिनेट मंत्री उल्लेख असलेल्या फलकाचे केलं अनावरण!