Bjp Mla Jaykumar Gore: भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जयकुमार गोरे यांना ताताडीचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 17 मेपर्यंत तहकूब केली आहे. वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एका मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेंच्या अटकपूर्व जामीनावर बुधवारी न्यायमूर्ती अनिल मेनन आणि नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
मायणी गावातील एका जमीनीसंदर्भात बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून तो फरार आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे.
यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. दरम्यान याप्रकरणी जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वडूज सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळल्यानंतर गोरे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे.
श्रीराम यांच्याबद्दल केलं होत वादग्रस्त
भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी भगवान श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होत. एका कार्यक्रमात मंचावरून जनतेला संबोधित करत असताना त्यांनी राम आणि रावण युद्धाचा प्रसंग सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, 'रामाचा हेतू वाईट होता, म्हणूनच त्याने रावणाशी युद्ध जिंकले, पण माझा हेतू स्पष्ट आहे'. असे ते दोनदा म्हणाले. मात्र, नंतर चूक लक्षात आल्यावर त्यांनी ती सुधारली. यावरून मोठा वाद त्यावेळी झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या: