BJP Lok Sabha Election 2024 : भाजपच्या (BJP) केंद्रीय निवडणूक समितीच्या (Central Election Committee) बैठकीत महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) 25 जागांवर चर्चा झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यातील (Maharashtra News) काही मोठ्या चेहऱ्यांना लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवावी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये आशिष शेलार (Ashish Shelar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाची चर्चा आहे. यापैकी काही नेते फारसे उत्सुक नसल्याचं कळतंय. मात्र, पक्षाचा आदेश आलाच तर लोकसभा लढवण्यावाचून कुठलाही पर्याय या नेत्यांसमोर नसणार आहे. 


सध्या भाजपच्या गोटातील वातावरण उलट्या प्रवाहात सुरू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सहसा निवडणुकांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक नेते अगदी प्राणांची प्रतिष्ठा लावत असतात. हवं ते करण्यासाठी तयार होतात, त्याबदल्यात फक्त तिकीट द्या, एवढीच अपेक्षा ठेवतात. मात्र, महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील भाजप नेते लोकसभेसाठी तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या काही नेत्यांची लोकसभेत खासदार म्हणून निवडून जाण्याची अजिबात इच्छा नाही. त्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. 


सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), आशिष शेलार (Ashish Shelar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांसारख्या नेत्यांना पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवारांनी तर थेट जाहीरपणे माझं तिकीट कापलं जावं यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतोय, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. 


एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार आशिष शेलारांनाही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सांगण्यात आलं आहे. पण, आशिष शेलारांनाही लोकसभा लढवण्यात फारसा रस नसल्याचं कळतंय. तर, केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनादेखील भाजप हायकमांडकडून लोकसभा लढवण्यासाठी सांगण्यात आलं, मात्र नारायण राणेंनी नाही न म्हणता, थेट प्रमोद जठारांचं नाव सुचवल्याची माहिती मिळत आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्र भाजपचे संकट मोचक अशी ख्याती असलेले गिरीश महाजनांचंही यामध्ये नाव आहे, मात्र महाजनांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास थेट नकार दिला. तसेच, विनोद तावडेंनाही लोकसभा लढवण्यास सांगितलं होतं, पण तावडेंनी हरियाणा आणि बिहारची जबाबदारी माझ्याकडे असल्याचं कारण पुढे करत लोकसभा लढवण्यास नकार दिल्याचं कळतंय. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


दिल्लीत शिंदेंची मोठी डील; मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपच्या पारड्यात, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा पत्ता कट, नेमकं समीकरण काय?