Ashok Chavan: नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील भाजप (BJP) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या सूनबाईला आमदार बनवण्यासाठी खतगावकर यांनी हा निर्णय घेतलाय, असे स्वतःच त्यांनी जाहीर केलंय. तसेच, विकासाबाबतीत अशोक चव्हाण यांच्याकडून काही अपेक्षा होत्या, पण अपेक्षाभंग झाल्यामुळे आपण काँग्रेसमध्ये जात असल्याचही खतगावकर यांनी काँग्रेसमधील (Congress) प्रवेशाची घोषणा करताना म्हटले होते. आता, खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशावर अशोक चव्हाण यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील, अशा शब्दात मेहुणे खतगावकर यांच्या काँगेस  प्रवेशाच्या घोषणेवर  अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर भाष्य करताना समन्वयातून मार्ग काढण्याची शासनाची भूमिका आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण करु नये, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 


खासदार अशोक चव्हाण यांचे दाजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँगेस प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे, यासंदर्भात त्यांचे मेव्हुणे आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता, आमच्याकडे राहिले  तर सुरक्षित राहतील अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी  दिली. माजी खासदार खतगावकर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे खतगावकर यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात विचारले असता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. मात्र, आज पुन्हा एकदा अशोक चव्हाणा यांना विचारले असता, खतगावकर आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील मी इतक सांगू शकतो, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. चव्हाण यांना नेमकं काय सांगायचंय, अशी चर्चा नांदेड जिल्ह्यात होत आहे. 


जरांगे पाटील यांनी उपोषण करु नये - अशोक चव्हाण


मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले. मात्र, मराठा आरक्षणाबाबत बरंच काम झालेल आहे, समन्वयातुन मार्ग सुटलेला आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळालं असून, कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. अनेकांना त्यावर नोकऱ्याही लागल्या, त्यामुळे मनोज जरांगे यांनी उपोषणाचा मार्ग न स्वीकारता, समन्वयातून मार्ग काढण्याची शासनाची भूमिका आहे. त्यास, जरांगे यांनी प्रतिसाद द्यावा अशी माझी विनंती असल्याचं अशोक चव्हाण यांनी आरक्षण व मनोज जरांगेंच्या उपोषणाससंदर्भातील  प्रश्नावर उत्तर दिले. 


हेही वाचा


ह्रदयद्रावक... विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ट्रॅक्टरखाली येऊन तीन मुलींचा मृत्यू; चितोड गावात शोककळा