Pawanraje Ralebhat जामखेड : भाजप आमदार राम शिंदे (ram shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांना पुन्हा जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे (ncp) युवानेते आणि जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक पवनराजे राळेभात (pawanraje ralebhat) यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राळेभात यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात (bjp) प्रवेश केला.
पवनराजे राळेभात यांनी बुधवारी चौंडी येथे आ. राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे विधानसभाक्षेत्र प्रमुख रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर अर्चना राळेभात, संपत राळेभात , सचिन पोटरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
आ. रोहित पवार यांना मोठा धक्का
दरम्यान पवनराजे राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने आ. रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्याने जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे. तर राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडले आहे.
आगामी काळात भाजपची ताकद वाढवणार
आमच्या घरात आधीपासूनच हिंदुत्वाची शिकवण आम्हाला मिळाली होती. आम्ही आधी शिवसेनेत (shivsena) होतो. मधल्या काळात आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो त्यावेळी राष्ट्रवादीसोबत काम करताना काय अनुभव आलाय त्याबद्दल न बोललेलंच बरं असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या पवनराजे राळेभात यांनी आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येत्या काळात जामखेड शहरात आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह भाजपची ताकद कशी वाढेल, यासाठी काम करणार असल्याचे पवनराजे राळेभात यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांची पुन्हा ईडी चौकशी
बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे. यापूर्वी 24 जानेवारी रोजी त्यांची या प्रकरणात पहिल्यांदा ईडीकडून चौकशी झाली होती. आज पुन्हा एकदा रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीने 19 जानेवारी रोजी समन्स बजावले होते. 24 जानेवारी रोजी तब्बल 12 तास रोहित पवारांची ईडीनं चौकशी केली होती.
आणखी वाचा
Sanjay Raut : "देश 500 वर्ष मागे नेण्याची तयारी, मोदी-शाह अश्मयुगात घेऊन जाताय"; संजय राऊत कडाडले