मुंबई: यवतमाळ वाशिच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या ठाणे आणि कल्याणमध्ये प्रचारात उतरणार आहेत. भावना गवळी या वाशिम जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ठाण्याला झाल्या रवाना झाल्या आहेत.   


समर्थकांसह मुंबईला रवाना


खासदार भावना गवळी या शिंदे गटाच्या शिवसेनेला ताकद देण्यासाठी जवळपास 25 ते 30 पदाधिकारी घेऊन  प्रचार करण्यासाठी ठाण्याकडे रवाना झाल्या आहेत. ठाणे आणि कल्याणच्या प्रतिष्ठेच्या या लढाईमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावून विजयामध्ये आपला वाटा असला पाहिजे याकरिता भावना गवळी आणि त्यांचे समर्थक पदाधिकारी मुंबईला रवाना झाले.


यापूर्वीला 20 एप्रिल रोजी वाशिमच्या मंगरूळपीर इथे एक सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांना राज्यामध्ये काम करायचं असल्याचं जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे आता भावना गवळी राज्यात प्रचाराला उतरल्या की काय असा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. 


भावना गवळींना राज्यासाठी काम करायचं आहे


वाशिम जिल्हा दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरसभेत भावना गवळी यांचे आभार मानलं होतं.  गेली   25 वर्षे  खासदार राहिलेल्या भावना गवळी या यंदा पक्षाचा आदेश मानून थांबल्या. भावना गवळी या वाशिममध्ये थांबल्या असल्या तरी त्यांना राज्यासाठी काम करायचं आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. भावना गवळी यांनी निश्चिंत राहावं, त्यांचा भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले होते.


भावना गवळींना शिवसेनेत वेगळी जबाबदारी?  


उमेदवारी नाकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला मान देत भावना गवळी या आता थेट मुंबई, ठाण्याकडे रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेना पक्ष भावना गवळी यांना कोणत्या जबाबदारी देतात ते पाहावं लागेल.


भावना गवळी यांचं तिकीट कापलं


शिवसेना शिंदे गटाच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी या यावेळीही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होत्या. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार अशी चर्चा असताना भाजपने मात्र त्यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे त्याचं तिकीट कापण्यात आलं आणि ते हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं. 


ही बातमी वाचा: