Bhaskar Murlidhar Bhagare : लाल कांद्याचे भाव घसरल्याने खासदार भास्कर भगरे (Bhaskar Murlidhar Bhagare) यांनी संसदेत शून्य प्रहरामध्ये ‌कांदा प्रश्नावर चर्चा करत सभागृहाचे लक्ष वेधून घेत निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली आहे. चारच दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये साडे तीन ते चार हजारांवर स्थिर असलेल्या लाल कांद्याची लाली अचानक कमी झाली, मागील आठवड्यात दि.13 च्या दरम्यान सटाणा, लासलगाव चांदवड,उमराणे, देवळा येथील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या भावात बऱ्यापैकी सुधारणा दिसून येत असतानाच, वाढलेल्या आवकेच कारण पुढे करून भाव पाडले जात असल्याची चर्चा आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने आज सोमवारी लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळाली, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस भर पडत आहे,त्याचा थेट परिणाम कांदा भावावर दिसून येत आहे. 


 भास्कर भगरेंनी लोकसभेत शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला, कांदा निर्यात शुल्काबाबत मोठी मागणी 


भास्कर भगरे म्हणाले, माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा हे प्रमुख पीक आहे. राज्यासह आमच्या जिल्ह्यात कांद्याचं उत्पादन चांगलं झालं आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये या राज्यामध्ये देखील कांद्याची आवक अंदाजे तीन ते चाळीस टक्क्यांनी वाढली आहे. परंतु कांद्याच्या किमती कमी होत आहेत. दुबईसह आखाती देशामध्ये भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा कांदा हा कमी किमतीमध्ये निर्यात होत आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला आखाती देशामध्ये मागणी कमी आहे. ही बाब कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीने गंभीर आहे. 


केंद सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या 20% निर्यात शुल्कामुळे लाल कांदा निर्यातीवर परिणाम झाला आहे, निर्यात शुल्क झिरो करण्याची मागणी दिंडोरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार भास्करराव भगरे यांनी झिरो अवर मध्ये जोरदारपणे मांडून सभागृहाचं लक्ष वेधून घेत निर्यात शुल्क तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.  मागच्या आठवड्यात चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त भावाने विकला जाणारा लाल कांदा अचानक अडीच, तिन हजार पर्यंत खाली घसरले, ही बाब खासदार महोदयांनी जाणून घेत निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली ते योग्य झाले, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?