नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने 'दादां'ना मोठा धक्का दिला आहे.भाग्यश्री आत्राम यांनी 'घड्याळ' सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. आपल्या लेकीने असा निर्णय घेतल्यास तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीत फेकून देऊ, असा पवित्रा धर्मरावबाबांनी घेतला होती. मात्र भाग्यश्री आत्रामांनी वडिलांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवत पक्षांतर केले आहे. त्यामुळे बापलेक आमनेसामने आले आहेत...तसंच शरद पवार पक्षात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांनी वडिल धर्मरावबाबा आत्राम यांना थेट इशारा दिलाय.
भाग्यश्री आत्राम म्हणाल्या , निसर्ग कोपला अन्यथा अधिक मोठा कार्यक्रम केला असता. या क्षेत्रात विकास झालेला नाही.कार्यकर्त्यांना पोहचण्यासाठी अडचणी आल्या.
सुरजागड प्रकल्प / उद्योगाने लक्षात घ्यावे, गाठ माझ्याशी आहे. रस्ते नाही, पूर येतोय, काम करणाऱ्याचे पाय ओढले जातात. या समस्या सुटाव्या यासाठी पक्षप्रवेश केला. शासनाकडून आदिवासी विकासाला निधी येतो , तो पूर्ण खर्च होत नाही, आदिवासी प्रकल्पात गर्दी होत नाही.
2019 ला बाबा भाजपच्या वाटेवर असताना अजितदादा यांनीच मला बी फॉर्म दिला : भाग्यश्री आत्राम
भाग्यश्री आत्राम म्हणाल्या , धर्मरावबाबा आत्राम माझे वडील आहेत, मी आशीर्वाद घेईन. मागच्या सभेत मला नदीत ढकलून देण्याची भाषा केली, ते चुकीचे होते, मंचावर अजितदादा होते, महिला आयोग अध्यक्षा होते, तरीही बोलले. मी घर फोडून जात नाहीये, धर्मरावबाबा नक्षल तावडीत होते तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली. अजितदादा यांनी म्हटले चूक झाली. तुम्हीच शरद पवार गटात या, चूक सुधारा. मी शरद पवार यांचे ऋण विसरू शकत नाही. 2019 मध्ये अजितदादा म्हणाले भीक मागायला आले की तिकीट मागायला. 2019 ला बाबा भाजपच्या वाटेवर असताना अजितदादा यांनीच मला बी फॉर्म दिला आणि घर फोडून उभे रहा असे म्हटले याला जयंत पाटील साक्षीदार आहे.
माझ्या कार्यकर्त्याना हात लावू नका, कापून टाकीन; आत्रमांच्या लेकीचा इशारा
मी स्वतः घर सोडून आली आहे, मला घर शोधायचे आहे. मी स्वतः भिंगरी सारखी फिरले. मी आणि बाबा एकच नाही, मी माझा मार्ग वेगळा केला आहे.. बाबा अजूनही राजाप्रमाणे थाटात आहेत, सुधरले नाहीत. आम्हाला कुणी हात धरून शिकविले नाही. मला संधी द्या, सोने करेल. माझ्यासोबत जनता आहे. आता माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत. ते शेर आहेत तर मी शेरनी आहे, माझ्या कार्यकर्त्याना हात लावू नका, कापून टाकीन, असा इशारा देखील भाग्यश्री आत्राम यांनी दिला.
कोण आहेत भाग्यश्री आत्राम?
भाग्यश्री आत्राम हलगेकर या 2003 - 2004 मध्ये भारती विद्यापीठ पुणे येथे बीएस्सीचे शिक्षण घेत होत्या. दरम्यान धर्मराव बाबा आत्राम यांच्या .पत्नी स्नेहादेवी धर्मराव आत्राम यांच्या नागपूर इथे असलेल्या नातेवाईकांनी ऋतुराज यांचा लग्न संबंध जुळवून आणला होता. ऋतुराज हलगेकर हे मूळचे कर्नाटक येथील बेळगावचे रहिवासी आहेत. धर्मराव बाबा आत्राम यांना हा संबंध आवडला आणि 10 फेब्रुवारी 2008 मध्ये दोघांचं लग्न शाही पध्दतीने नागपुरात लावून दिले.
मागील लोकसभा निवडणुकीत मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यामुळे अहेरीची जागा खाली होणार होती. त्या जागी मुलगी भाग्यश्री आत्राम लढणार अस चर्चा ही सुरू झाली. मात्र बाबा आत्राम यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळू शकले नाही आणि मुलीचे स्वप्न भंगले. तेव्हापासून कुटुंबात सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. परिणामी, धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी व जावईच त्यांना आता आव्हान देणार आहे.